Sunday, August 30, 2020

ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर


 ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर


जेल आणि जेलच्या कहाण्या त्याही तिहार सारख्या दक्षिण आशियातील  सर्वात मोठ्या जेल मध्ये आयुष्याची ३५ वर्षे अधिकारी म्हणून काम करून तुरुंग अधीक्षक पदी सेवा निवृत्त झालेल्या सुनील गुप्ता ह्यांनी लिहलेला उत्तम स्वानुभव पुस्तकाच्या लिखाणात त्यांच्या सोबत हिंदुस्थान टाइम्स च्या राजकीय संपादक पदी असणाऱ्या सुनेत्रा चौधरी  देखील ह्या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत .

मुळात तिहार जेल चा पहिला परिचय २००५–०६ मध्ये इगतपुरी येथील आंतरराष्ट्रीय विपश्यना विश्व विद्यापीठ ( धम्मगिरी )येथील विपश्यना शिबिरात , तिहार जेल मध्ये डॉ किरण बेदी यांनी (१९९३–९४) तिहारच्या तुरुंग महानिरीक्षक पदी असताना तिहार मध्ये आमच्या एच आर च्या क्षेत्रात परवलीचा शब्द असणार ओ डी  इंटरवेंशन सारखे (Organization Development Interventions)  प्रयोग सुरू केले त्या प्रयोगातील एक प्रयोग म्हणजे जेल मधील कैद्यांसाठी विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली जेल मधील कैद्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी जेल मध्येच १० दिवसीय विपश्यना शिबीर घेतले ह्या शिबिराच्या प्रयोगावर आधारित " डूइंग टाईम डूइंग विपश्यना " नावाची एक सुंदरशी डॉक्युमेट्री आहे त्यात तिहार विषयी बरंच आहे मग ती विदेशी कैद्यांची मनोगते , तिहार मधील कोठड्याचे होणारे दर्शन  आणि तिहारचे  अंतरंगाचे थोडक्यात दर्शन घडले होते.

ह्या व्यतिरिक्त तिहार विषयी तेथील कैद्याबद्दल वर्तमान पत्राद्वारे माहिती तर मिळत होतीच पण असाच एक दिवशी ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर बद्द्दल वाचले आणि मागवले. ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर हे श्री. सुनील गुप्ता ह्यांनी तिहार मध्ये केलेल्या साधारण ३५ वर्षे सेवाकाळातील अनुभव आहेत त्याच बरोबर पुस्तकाच्या शीर्षकात असणाऱ्या ब्लॅक वॉरंट बद्दल सखोल माहिती पण आहे .ब्लॅक वॉरंट म्हणजे काय तर ज्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्हा साठी न्यायालय  फाशी ची शिक्षा सुनावते,आणि त्यास शिक्षेस दुसऱ्या शिक्षेत रूपांतर करण्यास राष्ट्रपती संमती दर्शवत नाही आणि मग त्या शिक्षेच्या अंमलबजवणी साठी न्यायालय जे वॉरंट काढते त्यास ब्लॅक वॉरंट असे म्हणतात.

लेखक हे तिहार जेल चे लॉ ऑफिसर या नात्याने त्याच्या कार्यकाळात तिहार मध्ये देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षे प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांच्या नोकरी काळात रंगा बिल्ला सारखे गुंड तर स्व. इंदिरा गांधींच्या मारेकरी सतवंत सिंह , केहर सिंह ,जे के एल एफ चा नेता मकबूल भट आणि शेवटी भारतीय संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू या फाशीच्या शिक्षांची अंमलबजावणीच्या करण्यात आली.

लेखकाने पुस्तकात ह्या सर्व फाशीच्या आधी कैद्याची मनस्थिती काय होती तसेच फाशीच्या कैद्यांना फाशी देण्याआधी  काय प्रकारचे सोपस्कार पार पाडले जातात जसे त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या भेटीगाठी , त्यांचे मृत्युपत्र , त्यांचे विलागिकरण , फाशी देण्याआधी जेल मध्ये काय तयारी करावी लागते , फाशीचा दोरखंड कुठून येतो आणि बरेच काही ह्या सर्व गोष्टी सविस्तरपणे पुस्तकात देण्यात आल्या आहेत .

परंतु लेखकाने दोन फाशीच्या शिक्षा बाबत काही  मते नोंदवली आहेत

१. मकबूल भट 

२ अफजल गुरू

त्या मताप्रमाणे मकबूल भट यांच्या शिक्षेच्या अमंल बजावणीच्या ही काही पार्श्वभूमीतून घाई घाई ने निर्णय घेऊन देण्यात आलेली फाशी होती. त्यास कारण होते असे की लंडन मधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी श्री रवींद्र म्हात्रे यांची के एल एफ च्या अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली होती  आणि तत्कालीन पंतप्रधान यांच्या वर जनतेचा दबाव वाढत होता ,०६ फेब्रुवारी १९८४ रोजी कै. रवींद्र म्हात्रे यांचा मृतदेह सापडला आणि ११  फेब्रुवारी १९८४ रोजी मकबूल भटला फासावर लटकविण्यात आले. मकबूल भट चे वकील कपिल सिब्बल यांच्या मते हा जुडीशियल मर्डर होता हे विशेष नंतर ह्याचं कपिल सिब्बल यांनी काँग्रेस बरोबर आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आज ते काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आहेत.

दुसरे अफजल गुरूच्या बाबतीत ह्या पुस्तका तील मताप्रमाणे संसद हल्ल्यावरील गुन्हाच्या तपासात त्रुटी होत्या जसे की अफजल गुरु ला अटक केल्यानंतर त्यास बरेच दिवस वकील नव्हता , फाशीची शिक्षा ही फक्त त्याच्या कबुली जबाबवर देण्यात आली होती , ज्या अधिकाऱ्याने अफजलची शरणागती घडवली होती त्याच पोलिस अधिकाऱ्याचा सांगण्यावरून अफजल ह्या हल्ल्यात वापरलेली वाहने मिळवून दिली होती , जेलच्या नियम पुस्तिके प्रमाणे फाशीची शिक्षा देण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर त्या कैद्याच्या नातेवाईकांना त्या बाबत माहिती देण्यात येते अफजल गुरूच्या फाशीचा निर्णय हा त्याच्या घरच्यांना तीन दिवस आधी स्पीड पोस्ट ने कळविण्यात आला होता व त्या बाबत चे पत्र  ११ फेब्रुवारी २०१३ रोजी  त्याच्या पत्नीस मिळाले तत्पूर्वी अफजल ला ०९ फेब्रुवारी २०१३ रोजीच फासावर लटकविण्यात आले होते. ह्या बाबत आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना अमेनेस्टी इंटरनॅशनल यांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्याच प्रमाणे तत्कालीन काश्मीर चे मुख्यमंत्र्यांनी (ओमर अब्दुल्ला) , लेखिका अरुंधती रॉय यांनी या फाशीची संभावना खून म्हणूनच केली होती.

ह्या दोन्ही फाशी नंतर दोन्ही कैद्याच्या फाशीनंतर त्यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार हे तिहार जेलच्या आवारातच करण्यात आले होते आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील ह्या अंत्यसंस्काराना उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.

ह्या फाशीनंतर एक तिहारच्या कोठडीत बिस्कीट बॅरोन असणारे तत्कालीन ब्रिटानिया बिस्कीट चे प्रमुख राजन पिल्लई यांचा तिहार मधील मृत्यू आणि त्यानंतर भारत सरकारने त्यांच्या पत्नीस दिलेली १० लक्ष रुपये ची भरपाई , निर्भया प्रकरणा तील कैदी विकास सिंह ह्याची आत्महत्या (की हत्या) .अण्णा आंदोलन आणि मग अण्णा सह एकेकाळी तिहारच्या प्रमुख असणाऱ्या किरण बेदी , अरविंद केजरीवाल ,विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आत असलेले के राजा,सुरेश कलमाडी, सुब्रतो रॉय यांची तिहार वारी आणि तिहार मधील त्यांचे वागणे याच बरोबर चार्ल्स शोभराज चे तिहार मधील वास्तव त्याने केलेली जेल फोडीची घटना,जेसिका लाल खुनातील प्रमुख आरोपी मनु शर्मा आणि शिक्षा भोगत असताना त्याने त्याच्या व्यवस्थापनाच्या पदवीचा वापर करून तिहार जेलचा बनवलेला ब्रँड "टी जे" या सर्व घटना जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर जरूर वाचा

"ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर"

ता.क. 

देव डी, लुटेरा,उडान, भावेश जोशी , ट्रप्पेड (Trapped) या सिनेमाचे डायरेक्टर आणि सॅक्रेड गेम्स या नेटफ्लीक्स वरील पहिल्या भारतीय सीरिज चे निर्माते श्री.विक्रमदित्य मोटवाने यांनी या पुस्तकाचे अधिकार आपल्या पुढील सीरिज साठी जुन–२० मध्ये विकत घेतले आहेत कदाचित थोड्याच दिवसात यावर सीरिज दिसेल.

#sunetrac

#blackwarrant

#sunilgupta

#vipassanameditation

Sunetra Choudhury

Roli Books

Monday, August 17, 2020

कोरोनाच्या कृष्णछायेत जगभरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या अथक प्रयत्नांचा मागोवा

 

कोरोनाच्या कृष्णछायेत 

१९६० मध्ये श्री राजा परांजपे दिग्दर्शित आणि श्री ग दि माडगूळकर लिखित "जगाच्या पाठीवर" ह्या चित्रपटातील श्री ग.दि.माडगूळकरांनी लिहलेले  जग हे बंदिशाळा या गाणाच्या खालील ओळी 

जो तो अपुल्या जागी जखडे

नजर न धावे तटापलीकडे

उंबरातले किडेमकोडे, उंबरीं करिती लीला

उंबरीं करिती लीला

जग हे बंदिशाला

जग हे बंदिशाला

कोरोना व्हायरस उर्फ कोरोना विषाणू च्या परिवारातील एका सदस्यांमुळे पसरलेल्या कोविड-१९ या विषाणूजन्य रोगाच्या साथीमुळे  मार्च -२० नंतर आणि काही देशात अगोदर कोणालाही कुठे जाता येता येत नाही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासावर ,घरातून बाहेर पडण्यावर सर्वच देशांनी कमी अधिक प्रमाणात प्रतिबंधात्म बंधने आणली आहेत सर्व जगाचे रूपांतर हे नाईलाजाने बंदीशाळेत झाले आहे. 

कोविड-१९ विषाणूजन्य रोगाच्या साथीमुळे साधारण २४-मार्च -२० रोजी भारताच्या पंतप्रधानांनी टीव्ही येऊन "मेरे प्यारे देशवासियो ,आज रात के बारा बजसे अगले तीन हफ़्तो तक सब घरमे रहे ,घरमे रहे" अशी घोषणा केली आणि भारतात कोविड-१९ च्या प्रतिबंधात कारवाई म्हणून संपूर्ण देशात लॉक डाउन जाहीर झाले व सर्वाना कोविड-१९ च्या साथीची बातमी लख्ख पणे माहिती पडली . जो तो आपल्या परीने ह्या साथीची माहिती इंटरनेट ,टीव्ही वरील न्युज चॅनेल यातून माहिती मिळवायचा प्रयन्त करू लागला. 

कुठेतरी वाचले होते कि साथ चीन ने जगावर केलेला जैविक अस्त्राचा प्रयोग आहे. त्यावर जगभरातील विविध माध्यमातून बऱ्याच प्रकारचे सिद्धांत मांडले जात होत वेगवेगळे तर्क लावले जात होते बऱ्याच  कहाण्या जन्माला येत होत्या  त्यातील एक कहाणी ही चीनच्या वुहान शहरातील वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी भोवती फिरते ती म्हणजे वुहान शहरातील वेट मार्केट मध्ये ह्या प्रयोगशाळेतील काही प्राणी   मिसळले गेले आणि त्यावर चालणाऱ्या प्रयोगातून ह्या विषाणूचा जगभरात प्रसार झाला . 

आता सुरवातीचे काही दिवस लॉक डाउन आणि वर्क फ्रॉम होम म्हणून जरा पुस्तके चाळायला सुरवात केली विचारांची दिशा सध्या जगावर घोंघावणाऱ्या चीन आणि अमेरिका यांच्या चालू असलेल्या तणावातून प्रामुख्याने हा चीनने अमेरिकेला नमविण्यासाठी आणि जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी संपूर्ण जगावर केलेला जैविक हल्ला असावा ह्याच दिशेने मन जास्त विचार करत होते म्हणून जैविक आणि रासायनिक हल्ल्यासंदर्भातील माहिती मिळवायला सुरवात केली . तसे वर्तमान पत्र वाचायची थोडीबहुत सवय असल्या मुळे पूर्वी आलेल्या स्वाईन फ्लू च्या काळातील श्री गिरीश कुबेर यांचे काही लेख डोक्यात होतेच आणि त्यांचेच  युद्ध जीवांचे जैविक आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास हे पुस्तक त्याच माहितीच्या ओढीतून वाचले त्यातून पूर्वीच्या बऱ्याच गोष्टीचा उलघडा झाला आणि ज्ञानात भर पडली . 

त्याच दरम्यान नेहमी प्रमाणे फेसबुक चाळत असताना फेसबुक च्या भिंतीवर राजहंसाचं श्री पंकज क्षेमकल्याणी यांची ११. ०७. २०२० ला डॉ . मृदुला बेळे लिखित कोरोनाच्या कृष्णछायेत जगभरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या अथक प्रयत्नांचा मागोवा ह्या पुस्तकांची जाहिरात बघितली आणि जाहिरात बघताक्षणी पुस्तकाच्या प्रतीची मागणी त्यांच्या कडे नोंदवली नेहमी प्रमाणे त्यांनी तत्परतेने पुस्तक कुरियर केले आणि ३०. ०७. २०२० रोजी संध्याकाळी पुस्तक प्राप्त झाले .

पुस्तकाची मागणी नोंदवल्या नंतर ते वाचून संपवेपर्यंत एक प्रकारची उत्सुकता होती कारण हे पुस्तक कोरोना भोवतीची गूढता दूर करण्यासाठी माझ्या दृष्टीने हा एक खजिनाच कारणही तसेच होते, पुस्तकांच्या लेखिका असणाऱ्या  डॉ. मृदुला बेळे यांचा ०१. ०३. २०२० रोजीचा लोकसत्ता वृत्तपत्रातील लोकरंग या पुरवणीत आलेला साथी आणि आवाक्याबाहेरची औषधे हा लेख आणि त्यांच्या पेटंट या विषयावर याच वृत्तपत्रात प्रकशित होणारे लिखाण हे पूर्वी पासून वाचत होतो त्यामुळे त्यांच्या कोरोना विषयी मराठीतील सर्वार्थाने प्रथम असणाऱ्या पुस्तकांतून कोरोनाच्या या साथीवर शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रकाशही पडेल यांची खात्री होती कारण  लेखिका ह्या महाराष्ट्रातील फ़ार्मसी शिक्षणाची मांदियाळी असणाऱ्या नाशिक येथील नाजि म प्र वि स च्या कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून पुणे विद्यापीठातून त्यांनी औषध निर्माण शास्त्राच्या डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) ही  मिळवली आहेत त्यामुळे हे पुस्तक इंग्रजीतील म्हणी प्रमाणे from the horse's mouth आहे .

हे पुस्तक १३ प्रकरणात विभागले गेले आहे पुस्तकांची कहाणी ही सुरु होते साधारण डिसेंबर -२०१९ च्या दुसऱ्या आठ्वड्यात स्थळ आहे वुहान शहरातील सी फूड मार्केट सी  फूड मार्केट तुम्हा आम्हा महाराष्ट्रीयांच्या दृष्टीने समुद्रातील माशांचा बाजार (महाराष्ट्रातील माश्याच्या बाजार गृहीत धरला आहे कारण पूर्वोत्तर भारतात विशेषतः नागालँड ,मिझोराम ,मणिपूर आणि मेघालयातील खाद्य संस्कृती जरा वेगळी आहे ) पण चीन मधील हे सी फूड मार्केट म्हणजे हरेक प्रकारचे मांस मिळण्याचे ठिकाण कारण चीनची खाद्यसंस्कृती मध्ये निषिद्ध असे काही दिसून येत नाही ते पाळीव पासून ते रानटी हिंस्त्र श्वापदापर्यन्त सर्व प्रकारच्या पक्षांचे ,कीटकांचे नि प्राण्यांचे मांस भक्षण करतात आणि ती त्यांची खाद्य संस्कृती ही आहे .ह्याच  सी फूड मार्केट्स ना आशियाई राष्ट्रात वेट मार्केट असे देखील म्हंटले जाते वेट मार्केट्स मध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा उगम मानला जात आहे .

तशी २००२ मध्ये आलेली सार्स ची साथ पण या वेट मार्केट ची देणं कारण २००३ मध्ये सार्स चा पहिला रुग्ण हा या ग्वांगग्डोंग च्या वेट मार्केट मधील एक मांस विक्रेेेताच होता ,कारण वेट मार्केटस विविध प्रकारची पाळीव आणि रानटी पशू एकाच जागी कोंबून ठेवलेली असतात व त्यांना असणारे संसर्ग एका प्राण्या तून दुसऱ्या प्राण्यात आणि या ना त्या मार्गाने मानवी शरीरात प्रवेश करते होतात व अश्या प्रकारच्या साथी जन्माला येतात.

ज्यावेळी कोविड–१९ च्या साथीने चीन मधील वुहान शहराच्या दारावर दस्तक द्यायला प्रारंभ केला होता त्यावेळी काय सर्व आरोग्य यंत्रणा झोपी गेली होती का हो तर नाही "हुबेई प्रोविन्सिअल हॉस्पिटल फॉर चायनीज आणि वेस्टर्न मेडिसिन" या संस्थेच्या श्वसन रोग विभागाच्या डॉ झांग जिशियान यांना , डॉ आय फेन आणि डॉ ली वेनलियान यांना या नव्या प्रकारच्या न्यूमोनिया ची चाहूल लागली होती आणि त्यांच्या मनात काही तरी भयंकर संकट घोंघावत आहे या शंकेची पाल चुकचुकली म्हणूनच त्यांनी त्यांच्या वैद्यकीय वर्तुळातील दुसऱ्या सहकारी वर्गासोबत व्ही Chat ह्या समाज माध्यमातून ह्या नवीन न्यूमोनिया बद्दल चर्चा करायला सुरुवात केली ते संभाषण चिनी पोलिसांच्या सेन्सॉर वर आले आणि चर्चा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स ला समाजात अफवा पसरवण्या च्या प्रयत्न करण्या बद्दल तंबी देण्यात आली हा एक प्रकारे चिनी यंत्रणेचा सत्य दाबण्याचा प्रयत्न च होता .तेथील यंत्रणा नुसत्या यावर च थांबल्या नाही तर वुहान वेट मार्केट पण धुवून काढले त्यांना वाटले की सर्व आलबेल झाले व सरकारी यंत्रणांच्या ह्या साफ सफाई मुळे जनता ही निर्धास्त झाली आणि पुढे जानेवारी मध्ये येणाऱ्या सर्व सार्वजनिक महोत्सवामध्ये मश्गूल झाली होती पण संकट दिवसेंदिवस गडद आणि गंभीर होत गेले आणि जानेवारीच्या शेवटा मध्ये हा फुगा फुटला आणि मग सगळी कडे साथीचे सावट आपला ताबा बसवू लागला नी सरतेशेवटी यंत्रणा जाग्या झाल्या  , जशी जशी रुग्ण संख्या वाढू लागली तसे तसे नागरिकांवर अधिका अधिक बंधने घालण्यात आणि हे तुमचे युद्ध आहे तुमच्या मदतीशिवाय हे लढण सरकारला अशक्य आहे हे बिंबवण्यास सुरुवात झाली. 

त्याच बरोबर ह्या साथी विषयी अजुन संशोधन सुरू झाले मग ह्या विषाणूचा उगम त्याची रचना आणि त्याचा मानवी शरीरातील संचार यावर अधि का अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले हे सर्व एकीकडे चीन मध्ये सुरू असताना ह्या विषाणू जगातील एक एक देश आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली मग त्यात इटली सारख्या राष्ट्राचे तर पार कंबरडेच मोडले,तर जगाच्या महासत्ता असलेल्या अमेरिकेतील नागरिकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा माज उतरवायला सुरुवात केली.

पण हे सर्व घडत असताना दक्षिण कोरिया, तैवान सारखे छोटे देश मात्र ह्या साथीला समर्थ पणे तोंड देत होती तर मोठी राष्ट्र मात्र गलीत गात्र होत होती.ह्या साथीने नुसत्या राष्ट्राच्या नव्हे तर  वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन , लान्सेत सारख्या प्रतिष्ठित जर्नल ला यांच्या मर्यादा दाखवून दिल्या.भारता सारख्या देशाच्या आरोग्य यंत्रणेची अश्या स्थितीला तोंड देण्या साठी कितपत सज्ज आहे आणि तिच्या काय मर्यादा आहे ते पण दाखून दिले

या सह कोरोना विषाणूच्या तांत्रिक बाबी त्याचा आजवरचा इतिहास हे सर्व ह्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे हे पुस्तक कोरोनाच्या साथी वर एक महत्व पूर्ण दस्त ऐवज ठरेल यात काही शंकाच नाही.

माझ्या दृष्टीने या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मध्ये प्रकाशन संस्थेने खालील सुधारणा घडवून असे मना पासून वाटते

१. पुस्तकाच्या प्रथम पानापासून मुद्रण दोष आहेत ते दूर करावेत

२.काही राजकीय घडमोडीचे संदर्भ दुरूस्त केले पाहिजेत जसे सोव्हिएत युनियन चे विभाजन नसून विघटन आहे ह्या प्रकारची आजुन काही संदर्भ दुरूस्त केले पाहिजे असे वाटते.


#mrudulabele

#COVID2019






Monday, August 3, 2020

एक होता कारसेवक






एक होता कारसेवक 

तसा माझा जन्म दिन ०९ नोव्हेंबर हा जगातील बऱ्याच परिणामकारक घटनांचा साक्षीदार आहे त्यातील उल्लेखनीय म्हणजे ०९ नोव्हेंबर १९८९ ह्या दिवशी बर्लिन ची भिंत पाडण्यात आली व पूर्व पश्चिम जर्मनीचे एकीकरण होऊन जर्मनी हे एक राष्ट्र उदयाला आले त्यानंतर बरोबर ३० वर्षांनी ०९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्या. रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखाली खालील न्यायवृंदाने बाबरी मशीद येथील २.७७ एकर जागा श्री राम लल्ला विराजमान यांच्या मंदिरासाठी देण्याचा आणि सुन्नी वअक़फ बोर्डला मशीद उभारणी साठी अयोध्येतच दुसरीकडे ०५ एकर जागा देण्याचा निकाल मुक्रर केला आणि साधारण १८५५ पासून चालू असणाऱ्या राम मंदिर वादावर पडदा पडला.

स्वतंत्र भारतात बऱ्याच घटनांनी समाजमनावर आणि सर्व सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकला किंवा विशिष्ठ भागात राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य संपूर्ण पणे बदलून टाकले तसा भारतीय केंद्रीय राजकीय पटलावर इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या सरकार नंतर आणि १९९१ मध्ये श्री पी व्ही नरसिंह राव यांच्या तुलनेने स्थिर सरकार येई पर्यंत भारताच्या केंद्रीय राजकीय पटलावर युतीच्या आणि अस्थिर सरकारचा एक कालखंड येऊन गेला त्यात श्री व्ही पी सिंग आणि श्री चंद्रशेखर यांचे सरकार स्थापन झालीत पडलीत नी पाडली गेलीत.

मुळात व्ही पी सरकार चर्चेत राहिले ते मंडल आयोगाच्या अमंलबजावणी मुळे मग त्यामुळे उत्तर भारतात झालेली विद्यार्थी आंदोलने आणि राजीव गोस्वामी ह्या विद्यार्थी नेत्याने स्वतःला जाळून घेऊन निषेध करण्याचा केलेला प्रयत्न तसा हा का कालखंड मंडल ते कमंडल ह्या राजकारणाचा जास्त होता कदाचित कारणही तसे होते व्ही पी सरकार हे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर सत्तेत होते आणि भारतीय जनता पक्षाने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत ७% मतासह लोकसभेत २ खासदार असणाऱ्या भाजप ने १९८९ साली ११ % मतासह लोकसभेत ८२ खासदार अशी लक्षणीय झेप घेतली होती आणि विविध राजकीय इतिहासकारांच्या मते ही मुळात शेटजी आणि भटजी यांचा पक्ष असे बिरूद लागलेल्या भाजपा चा मतदार हा उच्च वर्णीय आणि सामाजिक आरक्षणाच्या खुल्या वर्गातला होता नी आहे त्यामुळे व्ही पी सिंहांनी ऑगस्ट-१९९० मध्ये मंडल आयोगाच्या इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या शिफारशी ची अंमलबजावणी करून इतर मागासवर्गीयांना घटनादत्त २७ % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला . व्हि पी सिंहाच्या हया खेळी मुळे भाजपा नेतृत्वाने पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले आणि मंदिर वही बनायेंगे , गर्व से कहो हम हिंदू हैं चा नारा देत १२ सप्टेंबर १९९० रोजी श्री लाल कृष्ण अडवाणी राम रथ यात्रेची घोषणा केली ह्या यात्रेचा प्रवास हा सोमनाथ ते अयोध्या साधारण पणे १०००० किमी अंतरा चा होता आणि तिचा मुख्य उद्देश हा हिंदूचे एकत्रीकरण (कारसेवा ) आणि हिंदूच्या मनात अयोध्या येथे राम जन्मभूमीत राम मंदिर निर्माण करण्यासाठी जागृती निर्माण हा होता परंतु ती रथ यात्रा अयोध्या येथे पोहचण्याचा अगोदर श्री लालू प्रसाद यादव यांनी बिहार मधील समस्तीपुर येथे ही यात्रा अडवली आणि श्री लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली आणि त्याची फलश्रुती म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेले व्ही पी सिंग सरकार भाजपने पाठिंबा काढून घेतल्या मुळे गडगडले.

त्या काळात केंद्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर उजव्या विचासरणीच्या पक्षाचा उदय होत होता परिणामस्वरूप तत्कालीन युवा पिढीला ह्या उजव्या आणि तुलनेने आक्रमक अश्या पक्षांचे आणि अराजकीय वा राजकीय संघटनाचे आकर्षण वाटू लागले. मोठ्या प्रमाणात भारतीय युवा शक्ती ह्या संघटना मध्ये सहभागी होऊ लागली आणि नेत्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ लागली होती.ह्याचं युवकाच्या भावनांचा वापर करत हिंदुत्व वादी संघटनांनी पुन्हा एकदा अयोध्या येथे बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागातून कार सेवक ०६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवक गोळा केेले.ह्याचं कार सेवाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रस्तुत पुस्तकाचे लेखक हे अयोध्या येथील कार सेवेसाठी सहभागी झाले होते.

लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्व भूमी असणाऱ्या परिवारात वाढलेले त्यांचे वडील हे संघ परिवारातील कार्यकर्ते आणि मराठवाड्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रुजविण्याचे आणि विस्तारण्याचे कार्य केले आणीबाणीच्या काळात त्यांच्या घरात आणीबाणीच्या विरुद्ध गुप्त बैठका चालत त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या नावे अटक वॉरंट देखील निघाले होते आणि त्या वॉरंट वर त्यांच्या चुलत्यांना ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागला होता असा इतका संघ परिवाराशी आणि कार्याशी त्यांच्या कुटुंबाचा निकटचा संबंध होता .

लेखकाच्या उमलत्या वयात संघ म्हणजे शाखा ,धर्म रक्षण देशसेवा आणि रोजच्या संघाच्या शाखेत जाऊन काहीतरी उच्च ध्येय साध्य करणार हे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आणि वय वर्षे १२ ते २० मध्ये त्यांनी क्रमाने गट शाखा प्रमुख -शाखेचा मुख्य शिक्षक -शाखेचा कार्यवाह -मंडल कार्यवाह आणि शहर बौद्धिक प्रमुख ह्या जबाबदाऱ्या भूषविल्या संघ कार्यकर्त्यांसाठी असणाऱ्या महिनाभराच्या प्रशिक्षण प्रथम वर्ष ,द्वितीय वर्ष शिबीरात प्रशिक्षण देखील घेतले आणि संघाचे द्वितीय वर्ष स्वयंसेवक बनले . वयाच्या १२ व्या ते २० व्या वर्षापर्यंत त्यांचा संघाशी आलेल्या प्रत्यक्ष आणि सक्रिय संबंधातून त्यांच्यात अयोध्येचा एक कारसेवक घडला.

६ डिसेम्बर १९९२ ला बाबरी मशिद पाडल्यानंतर देशभरात उसळलेला हिंदू मुस्लीम धार्मिक दंगलीचा आगडोंब ,ठिकठिकाणी लागलेली संचारबंदी आणि समाजात आलेला तणाव यांची झळ जरी लेखकाच्या घरादारा पर्यंत प्रत्यक्ष पोहचली नव्हती तरी त्यांच्या शहरातील कानावर पडणाऱ्या जाळपोळीच्या ,मारहाणीच्या घटनांतून त्यांचा कारसेवक असण्याचा वृथा अभिमान गळून पडला,हिन्दू असण्याचा गर्व वाटेनासा झाला त्या अभिमानाची जागा घेतली ती स्वतः बद्दलच्या चिडीने ,अपराधी पणाने आणि अस्वस्थतेने ना तो हिंदू राहिला ना कारसेवक .

ह्यातुन बाहेर पडण्यासाठी लेखकाने स्वतः अत्ता दीपो भव ह्या तत्वाला अनुसरून चार्वाक ,बुद्ध तत्व ज्ञान ,जे कृष्णमूर्ती ह्यांच्या विचारांच्या वाचनांतून अभ्यासातून उत्तरे शोधण्याचे प्रत्यत्न सुरु केले व त्या वाचनातून आलेल्या निष्कर्षातून चांगले ,नैतिक जगण्यासाठी धर्म आणि ईश्वराची आवश्यकता नसते व विचारपूर्वक ईश्वर नाकारला . बरं हे त्यांच्यात झालेले वैचारिक परिवर्तन हे त्यांच्या त्यांच्या कुटुंबात सहजासहजी मान्य झाले असतील का हो की त्यांच्या वैचारिक विरोध हा होतंच असेल .........


या आणि इतर प्रश्नांची उत्तरे आणि लेखकाची वैचारिक भूमिका जाणून घेण्यासाठी जरूर वाचा


एक होता कारसेवक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande )





Saturday, August 1, 2020

कहाणी मुंबईच्या कामगार चळवळीची (१८५३ ते २०१७)





मुंबई शहरात अस्तंगत गेलेल्या कामगार चळवळीचा संक्षिप्त इतिहास

डाव्यांचे वैचारिक बैठक असणाऱ्या कामगार संघटना कॉमरेड डांगे सारखे नेते

गोदी कामगार चे नेते डिमेलो यांचा वारसा चालवणारे खऱ्या अर्थाने #बंदसम्राट असणारे जॉर्ज फर्नांडिस

कुठे पेशाने डॉक्टर असणारे परंतु दवाखान्यात येणाऱ्या खाण कामगाराचे शोषण बघून महाराष्ट्र खाण कामगार युनियन स्थापन करून तसेच यश अपयश यांची पर्वा न करता कोणीही तयार नसताना गिरणी कामगाराच्या संपाचे नेतृत्व स्वीकारणारे नेता कै.डॉ.दत्ता सामंत

यांनी सर्वाचे शिक्षणाने आणि पेशाने मनुष्यबळ व्यवस्थापक तथा आयुष्याच्या उत्तरार्धात कामगारांसाठी लढा उभारणार राजकारणी असणारे #अजितसावंत यांनी केलेले उत्तम शब्दांकन आहे

#कामगारचळवळ
#डावेleft
#कामगारसंघटना
#संप
#बंदगिरणीकामगारसंघटना

The Management of Management




भारतात व्यंग चित्रकार आणि टीकाकार यांची थोर परंपरा आहे त्यात ज्यांची व्यंगचित्रे मैलाचा दगड ठरली आहेत ते म्हणजे #मार्मिककारवंदनीयबाळासाहेबठाकरे आणि #कॉमनमॅन या व्यंग चित्राचे जनक #आरकेलक्ष्मण

ह्या जोडगोळीने त्यांच्या रेखाटनातून वर्तमान पत्रात तून तत्कालीन राजकीय, सामजिक आणि आर्थिक परिस्थिती वर भाष्य केले , चिमटे काढले आणि फटकारे ओढले अर्थात विषयाचे सखोल आकलन असल्याशिवाय भाष्य करणे सोपे नसते .

याचं जोडगोळी मधील आर के लक्ष्मण यांच्या The Management of Management या पुस्तकात त्यांनी  All India Management Association या संस्थेच्या मासिकात तसेच टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमान पत्रात १९७७ पासून वेळोवेळी प्रकाशित करण्यात आलेल्या खाजगी उद्योगातील व्यवस्थापनावर आधारित रेखाटलेल्या व्यंगचित्राचा हा संग्रह आहे .यात कारखान्यातील व्यवस्थापन ,बोर्ड रूममधील चर्चा , मनुष्यबळ विभाग संबधित व्यंगचित्रे आहेत.

हा संग्रह प्रथम १९७७ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

२००७ मध्ये ह्याची शेवटची आवृत्ती छापण्यात आली होती.

#Managementcartoons
#RKLaxman
#TheManagementofManagement
#OR#HOW#MANAGERS#REALLY#MANAGE
#Signedcopy
#दुर्मिळपुस्तके

लेट मी से इट नॉव



लेट मी से इट नॉव  


मी जे काही अवांतर वाचत असतो त्या वाचनात आतापर्यंत भारतीय सनदी पोलिस अधिकाऱ्यांची (आयपीएस)आत्मचरित्र आणि अनुभव या विषयी ५ पुस्तके मी वाचली आहेत त्यात प्रामुख्याने

१.#मीवायसी_वायसीपवार ,
२. #दीप्लेनट्रूथ_एनकेसिंग
३.#आयडेअर_किरणबेदी
४.#CarnagebyAngels_वायपीसिंग
५.#बुलेटफॉरबुलेट_जेएफरिबेरो

तसे पोलिस प्रशासनात सर्वोच्च पदावर काम करून सेवानिवृत्तीनंतर अधिकाऱ्याचा त्यांचा सेवेत असतानाचा अनुभव , आव्हानं ही शब्दबद्ध केल्यामुळे त्यांचा फायदा या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि जाऊ इच्छिणाऱ्यांना आणि सर्व सामान्य नागरिकांना होतो.

हे सर्व आत्मचरित्र किंवा अनुभव तत्कालीन संदर्भ ,काही पडद्यामागच्या घडामोडी प्रकाशात् आणतात आणि त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून त्याबाबत बरीच चर्चा ,मत मतांतरे मांडली जातात बरेच तर्क वितर्क लढवले जातात तश्याच काहीश्या स्वरूपाचे लेट मी से इट नाव हे राकेश मारिया यांचे आत्मचरित्र आहे.

राकेश मारिया हे १९८३ भारतीय पोलिस सेवा तुकडीचे महाराष्ट्र केडर चे अधिकारी.

या आत्मचरित्रात त्यांनी त्यांचा बांद्रा बॉय ते मुंबई पोलिस दलाचे प्रमुख या पदापर्यंत चा प्रवास मांडला घरात कोणतीही सरकारी सेवेची पार्श्वभूमी नसताना यूपीएससी ची परीक्षा प्रथम प्रयत्नात उ्तीर्ण होऊन आयपीएस सेवेची निवड, त्यांचा ग्रामीण महाराष्ट्रातील सेवा , मुंबई तील १९९३ बॉम्ब स्फोट मालिकांचे तपास अधिकारी,२६/११ नोकरीतील चढउतार ,अंतर्गत राजकारणातून मिळालेल्या साईड पोस्टिंग्स असे आणि बरेच काही ऐकून ३५ प्रकरणे या पुस्तकात आहेत.

हे पुस्तक का वाचावे


१.ज्यांना मुंबईतील नवदी नंतरची सर्व बॉम्ब स्फोट प्रकरणे त्यातील अतिरेकी कारवाया
२.२६११ चा मुंबई वरील अतिरेकी वरील हल्ला त्यात मीडियाची टी आर पी साठी असलेली घाई त्यामुळे धोक्यात आलेले पोलिसाचे जीव
३.या हल्यात विरमरण  आलेली अधिकारी कै अशोक कामटे यांच्या पत्नी यांनी केलेले आरोप त्यास मारिया यांनी सांगितलेली बाजू

४.शिना बोरा हत्याकांडाचा तपास आणि त्यामुळे निर्माण झालेले वाद आणि अजुन बरच काही
५. सरकारी बदली साठी होणारे अंतर्गत राजकारण

#ips
#auobioghraphy
#rakeshmaria
#bookreview
#Letmesayitnow


बॅरिस्टरचं कार्टं







आज बॅरिस्टरचं कार्टं हे डॉ हिम्मतराव बावस्कर लिखित आत्मचरित्र वाचून झाले.

तसे आजपर्यंत डॉक्टरी पेशात असणारे पण पेशासाठी आणि समजासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या ५ व्यक्ती मत्त्वाची आत्मचरित्र किंवा त्यांच्या जीवनाविषयी अनुभव वाचले त्यात

१.#वार्डनं५#डॉरविबापट
२.#मेळघाटावरचीमोहोर:#डॉरवींद्रकोल्हे
३.#माझासाक्षात्कारीहृदयरोग#डॉअभयबंग
४. #हृदयस्थ:#डॉअलकामांडके
५.#परतमायभूमीकडे#डॉसंग्रामपाटील (Sangram G Patil)

वरील पैकी एक जनरल सर्जन,दोन एम डी मेडीसिन आणि एक भारतातील सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञाचे आणि परदेशातील सर्व सुखसुविधा झिडकारून माय भूमीच्या सेवेसाठी भारतात परतणाऱ्या भूलतज्ज्ञ असणाऱ्या वैद्यकाचे

वरील पाच पुस्तकांपेक्षा हे सहावे पुस्तक सर्वार्थाने भिन्न आणि मनात स्थान निर्माण करणारं आहे .

यात आ. #डॉहिम्मतरावबावस्कर यांचा बालपणातील शिकण्यासाठी चा संघर्ष त्यांच्या व त्यांच्या वडिलांचा शिकण्यासाठी आणि शिकून पुढे जाण्यासाठी असणारा दूरदृष्टी कोन, आग्रह त्याचा अट्टाहास म्हणून स्वतच्या पोटाला चिमटा देऊन मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातून बुलढाणा शहरात केलेली स्थलांतर हे मनाला उभारी देऊन जाते .

शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन घरची परिस्थती दारिद्र्याची. नी दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असणारी होती असे अडचणीचे अनंत डोंगर अस ताना लहानपणा पासून कधी पुस्तकाच्या , औषधाच्या दुकानात, मंदिरात मोलमजुरी करून शिक्षण घेतले .

त्याकाळात नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून घरात किंवा कुटुंबात कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना तसेच अनंत संकटे असताना हार न मानता #एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केली प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही घनघोर प्रसंग येत असतात त्यातून सावरावे लागते आणि मार्गक्रमण करावे लागते डॉ साहेबाच्या आयुष्यात अगदी मानसिक रोगासारखी आलेली संकटे देखील त्यांनी उडवून लावली

अगदी सर्व यंत्रणा विरोधात असून देखील महाड सारख्या कोकणातील छोट्याश्या तालुक्यात राहून विंचू दंश वर प्रभावी औषध उपचार शोधून काढले की ज्याची दखल #लन्सेट (#Lancet) सारख्या नावाजलेल्या मासिकाने घेतली आणि छापले .

का वाचावे

१. जीवनात निराशा आली आणि मार्ग सापडत नसल्यास
२. #कष्ट
३.#चिकाटी
४. संकटावर मात कशी करावी आणि आपल्या कामात सातत्य कसे असावे

कोणी वाचावे

१. #डॉक्टर
२.#वैद्यकीयशिक्षणघेणाऱ्याविद्यार्थ्यांन
३.#इतर #कोण #ही

#बॅरिस्टरचंकार्टं

#डॉहिम्मतरावबावस्कर

#डॉक्टर्स
#विंचूदंश


बरे झाले देवा निघाले दिवाळे

बरी या दुष्काळे पीडा केली

बरे झाली जगी पावलों अपमान

अनुतापे तुझे राहिले चिंतन

झाला हा वमन संवसार


आणखी एक पाऊल


थांब #गडचिरोली लाच बदली करतो ह्या महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनात धडकी भरवनाऱ्या ब्रम्हं वाक्याला कोळून प्यायलेले महाराष्ट्रातील प्रशासनात फार थोडे अधिकारी आहेत की ज्यांनी आपल्या शासकीय सेवेतील उमेदीचा काळ हा गडचिरोली सारख्या नक्षल ग्रस्त भागात नुसताच घालवला नाही तर आपल्या कार्यातून तेथे ठसा उमटवला.

त्याच अधिकाऱ्या पैकी एक असणारे #श्रीईझेडखोब्रागडे (आयएएस) यांनी त्याचे प्रशासकीय सेवेतील अनुभव #आणखीएकपाऊल या आत्मचरित्रात मांडले आहेत

तसे गडचिरोली ह्या जिल्ह्याचा मी स्वतः २०१२ मध्ये सर्च येथील च्या निर्माण शिबिरात सहभागी होण्यासाठी केला होता. मुळात महाविद्यालयीन काळापासून गडचिरोली तेथील जंगल,नक्षलवाद , प्रशासन हा कायम आकर्षण बिंदू राहिला आहे .ते आकर्षण शमविण्यासाठी विविध साहित्याच्या माध्यमातून माहिती गोळा करतच होता आणि आहे त्यात सर्व प्रथम #नक्षलवादाचेआव्हान आणि #लोकयात्रादैनंदिनी या दोन श्री #देवेंद्रगावंडे लिखित दोन पुस्तकातून आणि लोकसत्ता या दैनिकात ते लिहीत असलेल्या सदरातून परिचय होता.

तसे #आणखीएकपाऊल ह्या पुस्तकाचा परिचय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या इच्छुकांच्या व्हॉट्सअँप समूहातून झाला , त्यामुळे उत्सुकता अधिकच ताणली गेली नी कधी हे पुस्तक मिळवतो आणि नी वाचतो असे झाले होते. हे पुस्तक मिळवून दिल्याबद्दल मी श्री Jeevan Bachhav Irs यांचा मी ऋणी राहू इच्छितो

हे आत्मचरित्र तसे श्री ई झेड खोब्रागडे सर यांच्या प्रशासकीय कारकिर्दी नुसार ३ भागात विभागता येते पहिला भाग हा त्यांची भारत सरकारच्या विविध उपक्रमातील (ऑर्डनन्स फॅक्टरी, डी आर डी ओ, ओ एन जी सी) नोकऱ्या ,मग वडीलाच्या शब्दाखातर जिल्हाधिकारी होण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यात यश मिळवून प्रशासनात गडचिरोली सारख्या नक्षल ग्रस्त जिल्यातील अहेरी सारख्या तीव्र प्रभावित भागात ४ वर्षाहून अधिक काळ उपजिल्हाधिकारी तसेच आयएएस झाल्यावर पुन्हा १४ महिन्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सेवेत आणि इतर जबाबदारीचे पदे त्यात वर्ध्या सारख्या शेतकरी आत्महत्या ग्रस्त जील्हाचे जिल्हाधिकारी,संचालक समाजकल्याण विभाग यासारख्या पदावरील कारकीर्द त्यात आपण ज्या सामजिक पार्श्व भूमीतून आलो आहोत त्याची जाणीव ठेवून सामाजिक उत्थानासाठी विविध योजना,मग संविधान वाचन यासारखा अभिनव उपक्रम आणि अन्य बरेच प्रभावी कार्यक्रम हाती घेवून त्यास मूर्त्य स्वरूप , प्रशासनातील बदल्या

तसे नक्षल ग्रस्त भागात काम करत असताना नक्षलवादीशी संबध हा एक खर गूढ विषय आहे पण प्रस्तुत पुस्तकात यासंबधी असणारी प्रकरणे आहेत आणि ज्यात सरळ नक्षलवाद्यांकडून घेरले जाणे असो की नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या आमदारांना सोडण्यासाठी केलेल्या वाटाघाटीत शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम असे या बद्दलचे लेखकाचे स्वतचं अनुभव स्वशब्द मध्ये आहेत त्यामुळे हे वेगळे ठरते.

हे पुस्तक कोणी वाचावे

१.स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी
२. प्रशासनात काम करत असलेल्या अधिकाऱ्यांनी
३.थांब गडचिरोली, नंदुरबार, धडगाव,पेठ ,सुरगाणा येथे बदली करतो अशी चेतावणी मिळाली आहे अश्यानी
४. प्रांताधिकारी यांना दंडाधिकारी म्हणून काय हक्क असतात व ते वापरून ते जनतेचे काय कल्याण करू शकतात यासंबधी जाणून घेण्यासाठी

पुन्हा एकदा श्री Jeevan Bachhav Irs आपला आभारी आहे की आपण मला माझ्या ह्या आत्मचरित्र वाचन छंदात हे आत्मचरित्र वाचनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मदत केली व पुस्तका ची प्रत मिळवून दिली यासाठी मी आपला सदैव ऋणी राहीन.

#आत्मचरित्र
#ezkhobragadeias
#ThanksJeevanBacchavIrs
#आणखीएकपाऊल

बाँबस्फोटानंतर.... मालेगाव

मी ज्या शहरातून आलोय त्या शहराबद्दल पण पुस्तक आहे असे कळल्यानंतर क्षणाचा ही विलंब न लावता ऑनलाईन मागवून वाचून संपवलेले हे #निळूदामले लिखित #बाँबस्फोटानंतरमालेगाव

#मालेगाव जिल्हा #नाशिक

जिथला पाऊस देखील #झांजेश्र्वराचा अभिषेक आणि #ईदगाह मैदानावर ची नमाज ऐकल्याशिवाय पडत नाही असे हिंदू आणि मुस्लिम धर्मीय संस्कृती ची सरमिसळ आणि एकरूपता असणारे एक महाराष्ट्रातील शहर.

ज्याला महाराष्ट्रातील इतर शहरा प्रमाणे इतिहास आहे भूगोल आहे.

तसे बाहेरच्यांच्या  दृष्टीने नदीच्या (मोसम उर्फ मोक्ष दाहिणी ) प्रवाहामुळे अलीकडे आणि पलीकडे असे भौगोलिदृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या विभागले गेलेले शहर काही लोकांच्या दृष्टीने मालेगाव म्हणजे छोटा पाकिस्तान वर्तमानात कोरोना मुळे देशपातळीवर गाजणारे  शहर पण ही मालेगावची खरी ओळख नाही. 

माझ्या दृष्टीने मालेगाव म्हणजे

#महाराष्ट्राचेमँचेस्टर ,महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे #.स्व #भाऊसाहेब #हिरे यांच्या सारखे दिग्गज नेते देणारे मालेगाव निव्वळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्राचे नेतृत्व करायची धमक असणारे नेते ज्या मातीत तयार झाले ते मालेगाव

जसे मालेगावातील हिंदू नी राज्य पातळीवर नेतृत्व केले तसे मुस्लिम धर्मीय विचाराने कडवे समाजवादी ,मालेगाव महानगरपालिका झाल्यानंतर पहिले महापौर असणारे पैगंबर वासी निहाल अहमद यांनी देखील राज्याचे कामगार मंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले ह्याचं निहाल भाईनी बाबरी मशीद पतनानंतर त्या घटनेचा निषेध म्हणून मरेपर्यंत आपल्याला सफारी वर काळी पट्टी बांधली असे मालेगाव आणि मालेगावचे लोक.

तसे #बाँबस्फोटानंतरमालेगाव हे १४५ पानाचे पुस्तक सप्टेंबर २००६ मध्ये झालेल्या बॉमबस्फोटां मध्ये मृत पावलेल्या ३१ मृतापैकी २७ मृताच्या परिवाराच्या लेखकांनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांची स्थिती (२००८ पहिली आवृत्ती) बॉम्ब स्फोटाचे त्यांच्या जीवनावर झालेले परिणाम, सरकारची तुटपुंजी भरपाई ,त्यात मालेगाव मध्ये नसणाऱ्या मुलभूत आरोग्य सुविधा त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्या मुळे आपल्या आप्तेष्टांच्या प्राण गेले ही नातेवाईकांची खंत तसेच बॉम्ब स्फोटाचे आरोपी म्हणून पकडले गेलेले नी माफिचे साक्षीदार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मुलाखती , मालेगावातील मानससोपचार तज्ञ यांची मते, हिंदू व्यापाऱ्यांच्या दृष्टीने मालेगाव नी तेथील बाजारपेठ हे सर्व व्यापकपणे नी त्यांच्या शब्दात लिहण्यात आले आहे.

ज्या प्रमाणे लेखक अधोरेखित करतात त्याप्रमाणे बढा वह पेट का घटा वह सेठ का ही मानसिकता सोडून मालेगांवात देखील पौर्वात्य देशाप्रमाने इस्लाम चा नव्याने अभ्यास होणे जरुरी आहे तरच मालेगाव हे रुढी परंपराच्या जंजाळातून बाहेर पडेल आणि २१ व्या शतकाशी एकरूप होऊ शकेल

हे पुस्तक कोणी वाचावे

१.ज्याला मालेगाव समजून घ्यायचे आहे त्या सर्वांनी
२. मालेगाव विषयी न समजून घेता मत व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाने
३. सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाने

#निळूदामले

#बढावहपेटकाघटावहसेठका

© स्वप्नील पवार

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...