Sunday, August 30, 2020

ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर


 ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर


जेल आणि जेलच्या कहाण्या त्याही तिहार सारख्या दक्षिण आशियातील  सर्वात मोठ्या जेल मध्ये आयुष्याची ३५ वर्षे अधिकारी म्हणून काम करून तुरुंग अधीक्षक पदी सेवा निवृत्त झालेल्या सुनील गुप्ता ह्यांनी लिहलेला उत्तम स्वानुभव पुस्तकाच्या लिखाणात त्यांच्या सोबत हिंदुस्थान टाइम्स च्या राजकीय संपादक पदी असणाऱ्या सुनेत्रा चौधरी  देखील ह्या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत .

मुळात तिहार जेल चा पहिला परिचय २००५–०६ मध्ये इगतपुरी येथील आंतरराष्ट्रीय विपश्यना विश्व विद्यापीठ ( धम्मगिरी )येथील विपश्यना शिबिरात , तिहार जेल मध्ये डॉ किरण बेदी यांनी (१९९३–९४) तिहारच्या तुरुंग महानिरीक्षक पदी असताना तिहार मध्ये आमच्या एच आर च्या क्षेत्रात परवलीचा शब्द असणार ओ डी  इंटरवेंशन सारखे (Organization Development Interventions)  प्रयोग सुरू केले त्या प्रयोगातील एक प्रयोग म्हणजे जेल मधील कैद्यांसाठी विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली जेल मधील कैद्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी जेल मध्येच १० दिवसीय विपश्यना शिबीर घेतले ह्या शिबिराच्या प्रयोगावर आधारित " डूइंग टाईम डूइंग विपश्यना " नावाची एक सुंदरशी डॉक्युमेट्री आहे त्यात तिहार विषयी बरंच आहे मग ती विदेशी कैद्यांची मनोगते , तिहार मधील कोठड्याचे होणारे दर्शन  आणि तिहारचे  अंतरंगाचे थोडक्यात दर्शन घडले होते.

ह्या व्यतिरिक्त तिहार विषयी तेथील कैद्याबद्दल वर्तमान पत्राद्वारे माहिती तर मिळत होतीच पण असाच एक दिवशी ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर बद्द्दल वाचले आणि मागवले. ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर हे श्री. सुनील गुप्ता ह्यांनी तिहार मध्ये केलेल्या साधारण ३५ वर्षे सेवाकाळातील अनुभव आहेत त्याच बरोबर पुस्तकाच्या शीर्षकात असणाऱ्या ब्लॅक वॉरंट बद्दल सखोल माहिती पण आहे .ब्लॅक वॉरंट म्हणजे काय तर ज्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्हा साठी न्यायालय  फाशी ची शिक्षा सुनावते,आणि त्यास शिक्षेस दुसऱ्या शिक्षेत रूपांतर करण्यास राष्ट्रपती संमती दर्शवत नाही आणि मग त्या शिक्षेच्या अंमलबजवणी साठी न्यायालय जे वॉरंट काढते त्यास ब्लॅक वॉरंट असे म्हणतात.

लेखक हे तिहार जेल चे लॉ ऑफिसर या नात्याने त्याच्या कार्यकाळात तिहार मध्ये देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षे प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांच्या नोकरी काळात रंगा बिल्ला सारखे गुंड तर स्व. इंदिरा गांधींच्या मारेकरी सतवंत सिंह , केहर सिंह ,जे के एल एफ चा नेता मकबूल भट आणि शेवटी भारतीय संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू या फाशीच्या शिक्षांची अंमलबजावणीच्या करण्यात आली.

लेखकाने पुस्तकात ह्या सर्व फाशीच्या आधी कैद्याची मनस्थिती काय होती तसेच फाशीच्या कैद्यांना फाशी देण्याआधी  काय प्रकारचे सोपस्कार पार पाडले जातात जसे त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या भेटीगाठी , त्यांचे मृत्युपत्र , त्यांचे विलागिकरण , फाशी देण्याआधी जेल मध्ये काय तयारी करावी लागते , फाशीचा दोरखंड कुठून येतो आणि बरेच काही ह्या सर्व गोष्टी सविस्तरपणे पुस्तकात देण्यात आल्या आहेत .

परंतु लेखकाने दोन फाशीच्या शिक्षा बाबत काही  मते नोंदवली आहेत

१. मकबूल भट 

२ अफजल गुरू

त्या मताप्रमाणे मकबूल भट यांच्या शिक्षेच्या अमंल बजावणीच्या ही काही पार्श्वभूमीतून घाई घाई ने निर्णय घेऊन देण्यात आलेली फाशी होती. त्यास कारण होते असे की लंडन मधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी श्री रवींद्र म्हात्रे यांची के एल एफ च्या अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली होती  आणि तत्कालीन पंतप्रधान यांच्या वर जनतेचा दबाव वाढत होता ,०६ फेब्रुवारी १९८४ रोजी कै. रवींद्र म्हात्रे यांचा मृतदेह सापडला आणि ११  फेब्रुवारी १९८४ रोजी मकबूल भटला फासावर लटकविण्यात आले. मकबूल भट चे वकील कपिल सिब्बल यांच्या मते हा जुडीशियल मर्डर होता हे विशेष नंतर ह्याचं कपिल सिब्बल यांनी काँग्रेस बरोबर आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आज ते काँग्रेस चे ज्येष्ठ नेते आहेत.

दुसरे अफजल गुरूच्या बाबतीत ह्या पुस्तका तील मताप्रमाणे संसद हल्ल्यावरील गुन्हाच्या तपासात त्रुटी होत्या जसे की अफजल गुरु ला अटक केल्यानंतर त्यास बरेच दिवस वकील नव्हता , फाशीची शिक्षा ही फक्त त्याच्या कबुली जबाबवर देण्यात आली होती , ज्या अधिकाऱ्याने अफजलची शरणागती घडवली होती त्याच पोलिस अधिकाऱ्याचा सांगण्यावरून अफजल ह्या हल्ल्यात वापरलेली वाहने मिळवून दिली होती , जेलच्या नियम पुस्तिके प्रमाणे फाशीची शिक्षा देण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर त्या कैद्याच्या नातेवाईकांना त्या बाबत माहिती देण्यात येते अफजल गुरूच्या फाशीचा निर्णय हा त्याच्या घरच्यांना तीन दिवस आधी स्पीड पोस्ट ने कळविण्यात आला होता व त्या बाबत चे पत्र  ११ फेब्रुवारी २०१३ रोजी  त्याच्या पत्नीस मिळाले तत्पूर्वी अफजल ला ०९ फेब्रुवारी २०१३ रोजीच फासावर लटकविण्यात आले होते. ह्या बाबत आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना अमेनेस्टी इंटरनॅशनल यांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्याच प्रमाणे तत्कालीन काश्मीर चे मुख्यमंत्र्यांनी (ओमर अब्दुल्ला) , लेखिका अरुंधती रॉय यांनी या फाशीची संभावना खून म्हणूनच केली होती.

ह्या दोन्ही फाशी नंतर दोन्ही कैद्याच्या फाशीनंतर त्यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार हे तिहार जेलच्या आवारातच करण्यात आले होते आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील ह्या अंत्यसंस्काराना उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.

ह्या फाशीनंतर एक तिहारच्या कोठडीत बिस्कीट बॅरोन असणारे तत्कालीन ब्रिटानिया बिस्कीट चे प्रमुख राजन पिल्लई यांचा तिहार मधील मृत्यू आणि त्यानंतर भारत सरकारने त्यांच्या पत्नीस दिलेली १० लक्ष रुपये ची भरपाई , निर्भया प्रकरणा तील कैदी विकास सिंह ह्याची आत्महत्या (की हत्या) .अण्णा आंदोलन आणि मग अण्णा सह एकेकाळी तिहारच्या प्रमुख असणाऱ्या किरण बेदी , अरविंद केजरीवाल ,विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आत असलेले के राजा,सुरेश कलमाडी, सुब्रतो रॉय यांची तिहार वारी आणि तिहार मधील त्यांचे वागणे याच बरोबर चार्ल्स शोभराज चे तिहार मधील वास्तव त्याने केलेली जेल फोडीची घटना,जेसिका लाल खुनातील प्रमुख आरोपी मनु शर्मा आणि शिक्षा भोगत असताना त्याने त्याच्या व्यवस्थापनाच्या पदवीचा वापर करून तिहार जेलचा बनवलेला ब्रँड "टी जे" या सर्व घटना जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर जरूर वाचा

"ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर"

ता.क. 

देव डी, लुटेरा,उडान, भावेश जोशी , ट्रप्पेड (Trapped) या सिनेमाचे डायरेक्टर आणि सॅक्रेड गेम्स या नेटफ्लीक्स वरील पहिल्या भारतीय सीरिज चे निर्माते श्री.विक्रमदित्य मोटवाने यांनी या पुस्तकाचे अधिकार आपल्या पुढील सीरिज साठी जुन–२० मध्ये विकत घेतले आहेत कदाचित थोड्याच दिवसात यावर सीरिज दिसेल.

#sunetrac

#blackwarrant

#sunilgupta

#vipassanameditation

Sunetra Choudhury

Roli Books

No comments:

Post a Comment

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...