Saturday, August 1, 2020

आणखी एक पाऊल


थांब #गडचिरोली लाच बदली करतो ह्या महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनात धडकी भरवनाऱ्या ब्रम्हं वाक्याला कोळून प्यायलेले महाराष्ट्रातील प्रशासनात फार थोडे अधिकारी आहेत की ज्यांनी आपल्या शासकीय सेवेतील उमेदीचा काळ हा गडचिरोली सारख्या नक्षल ग्रस्त भागात नुसताच घालवला नाही तर आपल्या कार्यातून तेथे ठसा उमटवला.

त्याच अधिकाऱ्या पैकी एक असणारे #श्रीईझेडखोब्रागडे (आयएएस) यांनी त्याचे प्रशासकीय सेवेतील अनुभव #आणखीएकपाऊल या आत्मचरित्रात मांडले आहेत

तसे गडचिरोली ह्या जिल्ह्याचा मी स्वतः २०१२ मध्ये सर्च येथील च्या निर्माण शिबिरात सहभागी होण्यासाठी केला होता. मुळात महाविद्यालयीन काळापासून गडचिरोली तेथील जंगल,नक्षलवाद , प्रशासन हा कायम आकर्षण बिंदू राहिला आहे .ते आकर्षण शमविण्यासाठी विविध साहित्याच्या माध्यमातून माहिती गोळा करतच होता आणि आहे त्यात सर्व प्रथम #नक्षलवादाचेआव्हान आणि #लोकयात्रादैनंदिनी या दोन श्री #देवेंद्रगावंडे लिखित दोन पुस्तकातून आणि लोकसत्ता या दैनिकात ते लिहीत असलेल्या सदरातून परिचय होता.

तसे #आणखीएकपाऊल ह्या पुस्तकाचा परिचय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या इच्छुकांच्या व्हॉट्सअँप समूहातून झाला , त्यामुळे उत्सुकता अधिकच ताणली गेली नी कधी हे पुस्तक मिळवतो आणि नी वाचतो असे झाले होते. हे पुस्तक मिळवून दिल्याबद्दल मी श्री Jeevan Bachhav Irs यांचा मी ऋणी राहू इच्छितो

हे आत्मचरित्र तसे श्री ई झेड खोब्रागडे सर यांच्या प्रशासकीय कारकिर्दी नुसार ३ भागात विभागता येते पहिला भाग हा त्यांची भारत सरकारच्या विविध उपक्रमातील (ऑर्डनन्स फॅक्टरी, डी आर डी ओ, ओ एन जी सी) नोकऱ्या ,मग वडीलाच्या शब्दाखातर जिल्हाधिकारी होण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यात यश मिळवून प्रशासनात गडचिरोली सारख्या नक्षल ग्रस्त जिल्यातील अहेरी सारख्या तीव्र प्रभावित भागात ४ वर्षाहून अधिक काळ उपजिल्हाधिकारी तसेच आयएएस झाल्यावर पुन्हा १४ महिन्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सेवेत आणि इतर जबाबदारीचे पदे त्यात वर्ध्या सारख्या शेतकरी आत्महत्या ग्रस्त जील्हाचे जिल्हाधिकारी,संचालक समाजकल्याण विभाग यासारख्या पदावरील कारकीर्द त्यात आपण ज्या सामजिक पार्श्व भूमीतून आलो आहोत त्याची जाणीव ठेवून सामाजिक उत्थानासाठी विविध योजना,मग संविधान वाचन यासारखा अभिनव उपक्रम आणि अन्य बरेच प्रभावी कार्यक्रम हाती घेवून त्यास मूर्त्य स्वरूप , प्रशासनातील बदल्या

तसे नक्षल ग्रस्त भागात काम करत असताना नक्षलवादीशी संबध हा एक खर गूढ विषय आहे पण प्रस्तुत पुस्तकात यासंबधी असणारी प्रकरणे आहेत आणि ज्यात सरळ नक्षलवाद्यांकडून घेरले जाणे असो की नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या आमदारांना सोडण्यासाठी केलेल्या वाटाघाटीत शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम असे या बद्दलचे लेखकाचे स्वतचं अनुभव स्वशब्द मध्ये आहेत त्यामुळे हे वेगळे ठरते.

हे पुस्तक कोणी वाचावे

१.स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी
२. प्रशासनात काम करत असलेल्या अधिकाऱ्यांनी
३.थांब गडचिरोली, नंदुरबार, धडगाव,पेठ ,सुरगाणा येथे बदली करतो अशी चेतावणी मिळाली आहे अश्यानी
४. प्रांताधिकारी यांना दंडाधिकारी म्हणून काय हक्क असतात व ते वापरून ते जनतेचे काय कल्याण करू शकतात यासंबधी जाणून घेण्यासाठी

पुन्हा एकदा श्री Jeevan Bachhav Irs आपला आभारी आहे की आपण मला माझ्या ह्या आत्मचरित्र वाचन छंदात हे आत्मचरित्र वाचनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मदत केली व पुस्तका ची प्रत मिळवून दिली यासाठी मी आपला सदैव ऋणी राहीन.

#आत्मचरित्र
#ezkhobragadeias
#ThanksJeevanBacchavIrs
#आणखीएकपाऊल

No comments:

Post a Comment

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...