Monday, August 17, 2020

कोरोनाच्या कृष्णछायेत जगभरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या अथक प्रयत्नांचा मागोवा

 

कोरोनाच्या कृष्णछायेत 

१९६० मध्ये श्री राजा परांजपे दिग्दर्शित आणि श्री ग दि माडगूळकर लिखित "जगाच्या पाठीवर" ह्या चित्रपटातील श्री ग.दि.माडगूळकरांनी लिहलेले  जग हे बंदिशाळा या गाणाच्या खालील ओळी 

जो तो अपुल्या जागी जखडे

नजर न धावे तटापलीकडे

उंबरातले किडेमकोडे, उंबरीं करिती लीला

उंबरीं करिती लीला

जग हे बंदिशाला

जग हे बंदिशाला

कोरोना व्हायरस उर्फ कोरोना विषाणू च्या परिवारातील एका सदस्यांमुळे पसरलेल्या कोविड-१९ या विषाणूजन्य रोगाच्या साथीमुळे  मार्च -२० नंतर आणि काही देशात अगोदर कोणालाही कुठे जाता येता येत नाही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासावर ,घरातून बाहेर पडण्यावर सर्वच देशांनी कमी अधिक प्रमाणात प्रतिबंधात्म बंधने आणली आहेत सर्व जगाचे रूपांतर हे नाईलाजाने बंदीशाळेत झाले आहे. 

कोविड-१९ विषाणूजन्य रोगाच्या साथीमुळे साधारण २४-मार्च -२० रोजी भारताच्या पंतप्रधानांनी टीव्ही येऊन "मेरे प्यारे देशवासियो ,आज रात के बारा बजसे अगले तीन हफ़्तो तक सब घरमे रहे ,घरमे रहे" अशी घोषणा केली आणि भारतात कोविड-१९ च्या प्रतिबंधात कारवाई म्हणून संपूर्ण देशात लॉक डाउन जाहीर झाले व सर्वाना कोविड-१९ च्या साथीची बातमी लख्ख पणे माहिती पडली . जो तो आपल्या परीने ह्या साथीची माहिती इंटरनेट ,टीव्ही वरील न्युज चॅनेल यातून माहिती मिळवायचा प्रयन्त करू लागला. 

कुठेतरी वाचले होते कि साथ चीन ने जगावर केलेला जैविक अस्त्राचा प्रयोग आहे. त्यावर जगभरातील विविध माध्यमातून बऱ्याच प्रकारचे सिद्धांत मांडले जात होत वेगवेगळे तर्क लावले जात होते बऱ्याच  कहाण्या जन्माला येत होत्या  त्यातील एक कहाणी ही चीनच्या वुहान शहरातील वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी भोवती फिरते ती म्हणजे वुहान शहरातील वेट मार्केट मध्ये ह्या प्रयोगशाळेतील काही प्राणी   मिसळले गेले आणि त्यावर चालणाऱ्या प्रयोगातून ह्या विषाणूचा जगभरात प्रसार झाला . 

आता सुरवातीचे काही दिवस लॉक डाउन आणि वर्क फ्रॉम होम म्हणून जरा पुस्तके चाळायला सुरवात केली विचारांची दिशा सध्या जगावर घोंघावणाऱ्या चीन आणि अमेरिका यांच्या चालू असलेल्या तणावातून प्रामुख्याने हा चीनने अमेरिकेला नमविण्यासाठी आणि जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी संपूर्ण जगावर केलेला जैविक हल्ला असावा ह्याच दिशेने मन जास्त विचार करत होते म्हणून जैविक आणि रासायनिक हल्ल्यासंदर्भातील माहिती मिळवायला सुरवात केली . तसे वर्तमान पत्र वाचायची थोडीबहुत सवय असल्या मुळे पूर्वी आलेल्या स्वाईन फ्लू च्या काळातील श्री गिरीश कुबेर यांचे काही लेख डोक्यात होतेच आणि त्यांचेच  युद्ध जीवांचे जैविक आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास हे पुस्तक त्याच माहितीच्या ओढीतून वाचले त्यातून पूर्वीच्या बऱ्याच गोष्टीचा उलघडा झाला आणि ज्ञानात भर पडली . 

त्याच दरम्यान नेहमी प्रमाणे फेसबुक चाळत असताना फेसबुक च्या भिंतीवर राजहंसाचं श्री पंकज क्षेमकल्याणी यांची ११. ०७. २०२० ला डॉ . मृदुला बेळे लिखित कोरोनाच्या कृष्णछायेत जगभरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या अथक प्रयत्नांचा मागोवा ह्या पुस्तकांची जाहिरात बघितली आणि जाहिरात बघताक्षणी पुस्तकाच्या प्रतीची मागणी त्यांच्या कडे नोंदवली नेहमी प्रमाणे त्यांनी तत्परतेने पुस्तक कुरियर केले आणि ३०. ०७. २०२० रोजी संध्याकाळी पुस्तक प्राप्त झाले .

पुस्तकाची मागणी नोंदवल्या नंतर ते वाचून संपवेपर्यंत एक प्रकारची उत्सुकता होती कारण हे पुस्तक कोरोना भोवतीची गूढता दूर करण्यासाठी माझ्या दृष्टीने हा एक खजिनाच कारणही तसेच होते, पुस्तकांच्या लेखिका असणाऱ्या  डॉ. मृदुला बेळे यांचा ०१. ०३. २०२० रोजीचा लोकसत्ता वृत्तपत्रातील लोकरंग या पुरवणीत आलेला साथी आणि आवाक्याबाहेरची औषधे हा लेख आणि त्यांच्या पेटंट या विषयावर याच वृत्तपत्रात प्रकशित होणारे लिखाण हे पूर्वी पासून वाचत होतो त्यामुळे त्यांच्या कोरोना विषयी मराठीतील सर्वार्थाने प्रथम असणाऱ्या पुस्तकांतून कोरोनाच्या या साथीवर शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रकाशही पडेल यांची खात्री होती कारण  लेखिका ह्या महाराष्ट्रातील फ़ार्मसी शिक्षणाची मांदियाळी असणाऱ्या नाशिक येथील नाजि म प्र वि स च्या कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून पुणे विद्यापीठातून त्यांनी औषध निर्माण शास्त्राच्या डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) ही  मिळवली आहेत त्यामुळे हे पुस्तक इंग्रजीतील म्हणी प्रमाणे from the horse's mouth आहे .

हे पुस्तक १३ प्रकरणात विभागले गेले आहे पुस्तकांची कहाणी ही सुरु होते साधारण डिसेंबर -२०१९ च्या दुसऱ्या आठ्वड्यात स्थळ आहे वुहान शहरातील सी फूड मार्केट सी  फूड मार्केट तुम्हा आम्हा महाराष्ट्रीयांच्या दृष्टीने समुद्रातील माशांचा बाजार (महाराष्ट्रातील माश्याच्या बाजार गृहीत धरला आहे कारण पूर्वोत्तर भारतात विशेषतः नागालँड ,मिझोराम ,मणिपूर आणि मेघालयातील खाद्य संस्कृती जरा वेगळी आहे ) पण चीन मधील हे सी फूड मार्केट म्हणजे हरेक प्रकारचे मांस मिळण्याचे ठिकाण कारण चीनची खाद्यसंस्कृती मध्ये निषिद्ध असे काही दिसून येत नाही ते पाळीव पासून ते रानटी हिंस्त्र श्वापदापर्यन्त सर्व प्रकारच्या पक्षांचे ,कीटकांचे नि प्राण्यांचे मांस भक्षण करतात आणि ती त्यांची खाद्य संस्कृती ही आहे .ह्याच  सी फूड मार्केट्स ना आशियाई राष्ट्रात वेट मार्केट असे देखील म्हंटले जाते वेट मार्केट्स मध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा उगम मानला जात आहे .

तशी २००२ मध्ये आलेली सार्स ची साथ पण या वेट मार्केट ची देणं कारण २००३ मध्ये सार्स चा पहिला रुग्ण हा या ग्वांगग्डोंग च्या वेट मार्केट मधील एक मांस विक्रेेेताच होता ,कारण वेट मार्केटस विविध प्रकारची पाळीव आणि रानटी पशू एकाच जागी कोंबून ठेवलेली असतात व त्यांना असणारे संसर्ग एका प्राण्या तून दुसऱ्या प्राण्यात आणि या ना त्या मार्गाने मानवी शरीरात प्रवेश करते होतात व अश्या प्रकारच्या साथी जन्माला येतात.

ज्यावेळी कोविड–१९ च्या साथीने चीन मधील वुहान शहराच्या दारावर दस्तक द्यायला प्रारंभ केला होता त्यावेळी काय सर्व आरोग्य यंत्रणा झोपी गेली होती का हो तर नाही "हुबेई प्रोविन्सिअल हॉस्पिटल फॉर चायनीज आणि वेस्टर्न मेडिसिन" या संस्थेच्या श्वसन रोग विभागाच्या डॉ झांग जिशियान यांना , डॉ आय फेन आणि डॉ ली वेनलियान यांना या नव्या प्रकारच्या न्यूमोनिया ची चाहूल लागली होती आणि त्यांच्या मनात काही तरी भयंकर संकट घोंघावत आहे या शंकेची पाल चुकचुकली म्हणूनच त्यांनी त्यांच्या वैद्यकीय वर्तुळातील दुसऱ्या सहकारी वर्गासोबत व्ही Chat ह्या समाज माध्यमातून ह्या नवीन न्यूमोनिया बद्दल चर्चा करायला सुरुवात केली ते संभाषण चिनी पोलिसांच्या सेन्सॉर वर आले आणि चर्चा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स ला समाजात अफवा पसरवण्या च्या प्रयत्न करण्या बद्दल तंबी देण्यात आली हा एक प्रकारे चिनी यंत्रणेचा सत्य दाबण्याचा प्रयत्न च होता .तेथील यंत्रणा नुसत्या यावर च थांबल्या नाही तर वुहान वेट मार्केट पण धुवून काढले त्यांना वाटले की सर्व आलबेल झाले व सरकारी यंत्रणांच्या ह्या साफ सफाई मुळे जनता ही निर्धास्त झाली आणि पुढे जानेवारी मध्ये येणाऱ्या सर्व सार्वजनिक महोत्सवामध्ये मश्गूल झाली होती पण संकट दिवसेंदिवस गडद आणि गंभीर होत गेले आणि जानेवारीच्या शेवटा मध्ये हा फुगा फुटला आणि मग सगळी कडे साथीचे सावट आपला ताबा बसवू लागला नी सरतेशेवटी यंत्रणा जाग्या झाल्या  , जशी जशी रुग्ण संख्या वाढू लागली तसे तसे नागरिकांवर अधिका अधिक बंधने घालण्यात आणि हे तुमचे युद्ध आहे तुमच्या मदतीशिवाय हे लढण सरकारला अशक्य आहे हे बिंबवण्यास सुरुवात झाली. 

त्याच बरोबर ह्या साथी विषयी अजुन संशोधन सुरू झाले मग ह्या विषाणूचा उगम त्याची रचना आणि त्याचा मानवी शरीरातील संचार यावर अधि का अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले हे सर्व एकीकडे चीन मध्ये सुरू असताना ह्या विषाणू जगातील एक एक देश आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली मग त्यात इटली सारख्या राष्ट्राचे तर पार कंबरडेच मोडले,तर जगाच्या महासत्ता असलेल्या अमेरिकेतील नागरिकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा माज उतरवायला सुरुवात केली.

पण हे सर्व घडत असताना दक्षिण कोरिया, तैवान सारखे छोटे देश मात्र ह्या साथीला समर्थ पणे तोंड देत होती तर मोठी राष्ट्र मात्र गलीत गात्र होत होती.ह्या साथीने नुसत्या राष्ट्राच्या नव्हे तर  वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन , लान्सेत सारख्या प्रतिष्ठित जर्नल ला यांच्या मर्यादा दाखवून दिल्या.भारता सारख्या देशाच्या आरोग्य यंत्रणेची अश्या स्थितीला तोंड देण्या साठी कितपत सज्ज आहे आणि तिच्या काय मर्यादा आहे ते पण दाखून दिले

या सह कोरोना विषाणूच्या तांत्रिक बाबी त्याचा आजवरचा इतिहास हे सर्व ह्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे हे पुस्तक कोरोनाच्या साथी वर एक महत्व पूर्ण दस्त ऐवज ठरेल यात काही शंकाच नाही.

माझ्या दृष्टीने या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मध्ये प्रकाशन संस्थेने खालील सुधारणा घडवून असे मना पासून वाटते

१. पुस्तकाच्या प्रथम पानापासून मुद्रण दोष आहेत ते दूर करावेत

२.काही राजकीय घडमोडीचे संदर्भ दुरूस्त केले पाहिजेत जसे सोव्हिएत युनियन चे विभाजन नसून विघटन आहे ह्या प्रकारची आजुन काही संदर्भ दुरूस्त केले पाहिजे असे वाटते.


#mrudulabele

#COVID2019






3 comments:

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...