Monday, August 3, 2020

एक होता कारसेवक






एक होता कारसेवक 

तसा माझा जन्म दिन ०९ नोव्हेंबर हा जगातील बऱ्याच परिणामकारक घटनांचा साक्षीदार आहे त्यातील उल्लेखनीय म्हणजे ०९ नोव्हेंबर १९८९ ह्या दिवशी बर्लिन ची भिंत पाडण्यात आली व पूर्व पश्चिम जर्मनीचे एकीकरण होऊन जर्मनी हे एक राष्ट्र उदयाला आले त्यानंतर बरोबर ३० वर्षांनी ०९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्या. रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखाली खालील न्यायवृंदाने बाबरी मशीद येथील २.७७ एकर जागा श्री राम लल्ला विराजमान यांच्या मंदिरासाठी देण्याचा आणि सुन्नी वअक़फ बोर्डला मशीद उभारणी साठी अयोध्येतच दुसरीकडे ०५ एकर जागा देण्याचा निकाल मुक्रर केला आणि साधारण १८५५ पासून चालू असणाऱ्या राम मंदिर वादावर पडदा पडला.

स्वतंत्र भारतात बऱ्याच घटनांनी समाजमनावर आणि सर्व सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकला किंवा विशिष्ठ भागात राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य संपूर्ण पणे बदलून टाकले तसा भारतीय केंद्रीय राजकीय पटलावर इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या सरकार नंतर आणि १९९१ मध्ये श्री पी व्ही नरसिंह राव यांच्या तुलनेने स्थिर सरकार येई पर्यंत भारताच्या केंद्रीय राजकीय पटलावर युतीच्या आणि अस्थिर सरकारचा एक कालखंड येऊन गेला त्यात श्री व्ही पी सिंग आणि श्री चंद्रशेखर यांचे सरकार स्थापन झालीत पडलीत नी पाडली गेलीत.

मुळात व्ही पी सरकार चर्चेत राहिले ते मंडल आयोगाच्या अमंलबजावणी मुळे मग त्यामुळे उत्तर भारतात झालेली विद्यार्थी आंदोलने आणि राजीव गोस्वामी ह्या विद्यार्थी नेत्याने स्वतःला जाळून घेऊन निषेध करण्याचा केलेला प्रयत्न तसा हा का कालखंड मंडल ते कमंडल ह्या राजकारणाचा जास्त होता कदाचित कारणही तसे होते व्ही पी सरकार हे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर सत्तेत होते आणि भारतीय जनता पक्षाने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत ७% मतासह लोकसभेत २ खासदार असणाऱ्या भाजप ने १९८९ साली ११ % मतासह लोकसभेत ८२ खासदार अशी लक्षणीय झेप घेतली होती आणि विविध राजकीय इतिहासकारांच्या मते ही मुळात शेटजी आणि भटजी यांचा पक्ष असे बिरूद लागलेल्या भाजपा चा मतदार हा उच्च वर्णीय आणि सामाजिक आरक्षणाच्या खुल्या वर्गातला होता नी आहे त्यामुळे व्ही पी सिंहांनी ऑगस्ट-१९९० मध्ये मंडल आयोगाच्या इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या शिफारशी ची अंमलबजावणी करून इतर मागासवर्गीयांना घटनादत्त २७ % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला . व्हि पी सिंहाच्या हया खेळी मुळे भाजपा नेतृत्वाने पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले आणि मंदिर वही बनायेंगे , गर्व से कहो हम हिंदू हैं चा नारा देत १२ सप्टेंबर १९९० रोजी श्री लाल कृष्ण अडवाणी राम रथ यात्रेची घोषणा केली ह्या यात्रेचा प्रवास हा सोमनाथ ते अयोध्या साधारण पणे १०००० किमी अंतरा चा होता आणि तिचा मुख्य उद्देश हा हिंदूचे एकत्रीकरण (कारसेवा ) आणि हिंदूच्या मनात अयोध्या येथे राम जन्मभूमीत राम मंदिर निर्माण करण्यासाठी जागृती निर्माण हा होता परंतु ती रथ यात्रा अयोध्या येथे पोहचण्याचा अगोदर श्री लालू प्रसाद यादव यांनी बिहार मधील समस्तीपुर येथे ही यात्रा अडवली आणि श्री लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली आणि त्याची फलश्रुती म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेले व्ही पी सिंग सरकार भाजपने पाठिंबा काढून घेतल्या मुळे गडगडले.

त्या काळात केंद्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर उजव्या विचासरणीच्या पक्षाचा उदय होत होता परिणामस्वरूप तत्कालीन युवा पिढीला ह्या उजव्या आणि तुलनेने आक्रमक अश्या पक्षांचे आणि अराजकीय वा राजकीय संघटनाचे आकर्षण वाटू लागले. मोठ्या प्रमाणात भारतीय युवा शक्ती ह्या संघटना मध्ये सहभागी होऊ लागली आणि नेत्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ लागली होती.ह्याचं युवकाच्या भावनांचा वापर करत हिंदुत्व वादी संघटनांनी पुन्हा एकदा अयोध्या येथे बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागातून कार सेवक ०६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवक गोळा केेले.ह्याचं कार सेवाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रस्तुत पुस्तकाचे लेखक हे अयोध्या येथील कार सेवेसाठी सहभागी झाले होते.

लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्व भूमी असणाऱ्या परिवारात वाढलेले त्यांचे वडील हे संघ परिवारातील कार्यकर्ते आणि मराठवाड्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रुजविण्याचे आणि विस्तारण्याचे कार्य केले आणीबाणीच्या काळात त्यांच्या घरात आणीबाणीच्या विरुद्ध गुप्त बैठका चालत त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या नावे अटक वॉरंट देखील निघाले होते आणि त्या वॉरंट वर त्यांच्या चुलत्यांना ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागला होता असा इतका संघ परिवाराशी आणि कार्याशी त्यांच्या कुटुंबाचा निकटचा संबंध होता .

लेखकाच्या उमलत्या वयात संघ म्हणजे शाखा ,धर्म रक्षण देशसेवा आणि रोजच्या संघाच्या शाखेत जाऊन काहीतरी उच्च ध्येय साध्य करणार हे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आणि वय वर्षे १२ ते २० मध्ये त्यांनी क्रमाने गट शाखा प्रमुख -शाखेचा मुख्य शिक्षक -शाखेचा कार्यवाह -मंडल कार्यवाह आणि शहर बौद्धिक प्रमुख ह्या जबाबदाऱ्या भूषविल्या संघ कार्यकर्त्यांसाठी असणाऱ्या महिनाभराच्या प्रशिक्षण प्रथम वर्ष ,द्वितीय वर्ष शिबीरात प्रशिक्षण देखील घेतले आणि संघाचे द्वितीय वर्ष स्वयंसेवक बनले . वयाच्या १२ व्या ते २० व्या वर्षापर्यंत त्यांचा संघाशी आलेल्या प्रत्यक्ष आणि सक्रिय संबंधातून त्यांच्यात अयोध्येचा एक कारसेवक घडला.

६ डिसेम्बर १९९२ ला बाबरी मशिद पाडल्यानंतर देशभरात उसळलेला हिंदू मुस्लीम धार्मिक दंगलीचा आगडोंब ,ठिकठिकाणी लागलेली संचारबंदी आणि समाजात आलेला तणाव यांची झळ जरी लेखकाच्या घरादारा पर्यंत प्रत्यक्ष पोहचली नव्हती तरी त्यांच्या शहरातील कानावर पडणाऱ्या जाळपोळीच्या ,मारहाणीच्या घटनांतून त्यांचा कारसेवक असण्याचा वृथा अभिमान गळून पडला,हिन्दू असण्याचा गर्व वाटेनासा झाला त्या अभिमानाची जागा घेतली ती स्वतः बद्दलच्या चिडीने ,अपराधी पणाने आणि अस्वस्थतेने ना तो हिंदू राहिला ना कारसेवक .

ह्यातुन बाहेर पडण्यासाठी लेखकाने स्वतः अत्ता दीपो भव ह्या तत्वाला अनुसरून चार्वाक ,बुद्ध तत्व ज्ञान ,जे कृष्णमूर्ती ह्यांच्या विचारांच्या वाचनांतून अभ्यासातून उत्तरे शोधण्याचे प्रत्यत्न सुरु केले व त्या वाचनातून आलेल्या निष्कर्षातून चांगले ,नैतिक जगण्यासाठी धर्म आणि ईश्वराची आवश्यकता नसते व विचारपूर्वक ईश्वर नाकारला . बरं हे त्यांच्यात झालेले वैचारिक परिवर्तन हे त्यांच्या त्यांच्या कुटुंबात सहजासहजी मान्य झाले असतील का हो की त्यांच्या वैचारिक विरोध हा होतंच असेल .........


या आणि इतर प्रश्नांची उत्तरे आणि लेखकाची वैचारिक भूमिका जाणून घेण्यासाठी जरूर वाचा


एक होता कारसेवक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande )





No comments:

Post a Comment

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...