Friday, July 31, 2020

द काव बॉय ज ऑफ आर अँड ए डब्ल्यू (रॉ) डाऊन मेमरी लेन


द काव बॉय ज ऑफ आर अँड ए डब्ल्यू (रॉ) डाऊन मेमरी लेन

अगदी प्राचीन काळापासून राज्य शकट यशस्वी पणे हाकण्यासाठी गुप्तहेर आणि गुप्तहेर संघटना यांचे महत्व आद्य प्रशासक आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य याने ओळखले आणि आपल्या कौटिल्य अर्थशास्त्र  या ग्रंथामध्ये विस्तृत पणे मांडले चाणक्याने १० वेग वेगळ्या प्रकारचे गुप्तहेर सांगितले आहे,त्यात विद्यार्थी (कपटीका) ते स्त्री (भिक्षिका) या सर्वाचा समावेश आहे.

मध्य युगात देखील वेगवेगळ्या राजवटी आपल्या पदरी विविध रूपात गुप्तहेर  आणि त्या प्रकारच्या यंत्रणा बाळगून होत्या  त्यात देशोदेशीच्या राज्यात आपले गुप्तहेर व्यापाऱ्यांच्या स्वरूपात असो किंवा राजदूत वा वकील म्हणून थेट दुसऱ्या राज्याच्या दरबारात पेरेलेत  आणि त्यांचा आपल्या कूट नीती साठी वेळोवेळी वापर करून घेतला .

अगदी महाराष्ट्रात उदाहरण द्यायचे झाले तर बहिर्जी नाईक हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचे संस्थापक आणि प्रमुख ,बहिर्जी ची नजर आणि गुप्तहेर पेरणी आणि शत्रूच्या गोटातील खडानखडा माहिती गोळा करण्याचं तंत्र हे अदभुत होते स्वतः बहिर्जी हे महाराजांच्या मोहिमेच्या अगोदर त्या प्रदेशात जाऊन संपूर्ण माहिती गोळा करत नी ती माहिती मोहिमेच्या यशात महत्त्व पूर्ण भूमिका निभावत असे.

मध्ययुगात आणि त्यानंतरच्या कालखंडात  भारतात ब्रिटिश आणि इतर पाश्चिमात्य हे व्यापारी हे व्यापारानिमित आलेत आणि चोर पावलांनी राज्यकर्ते झालेत.राज्य शकट प्रभावी पणाने हाकण्यासाठी म्हणा किंवा इतर ही काही कारणासाठी म्हणा तत्कालीन ब्रिटिश शासनाला गुप्तहेर संघटनेची गरज भासली आणि त्यातून साधारण १८८५ मध्ये मेजर जनरल चार्ल्स मॅक ग्रेगर यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातील रशियाच्या हालचालींवर गुप्त पणे पाळत ठेवण्यासाठी क्वार्टर मास्टर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आणि पुढे १९०९ मध्ये भारतातील राजकीय घडामोडी आणि क्रांतिकारी यावर लक्ष ठेवण्यासाठी इंडियन इंटेलिजन्स पोलिटिकल ऑफिस ची इंग्लंड मध्ये स्थापना झाली त्याच ऑफिस चे १९२१ मध्ये इंडिया ऑफिस आणि गवर्मेंट ऑफ इंडिया यांनी संयुक्त रित्या  इंडियन पोलिटिकल इंटेलिजन्स (आय.पी.आय) मध्ये रुपांतर केले त्या काळात ही संस्था स्कॉटलंड यार्ड आणि एम आय–५ या संस्था बरोबर संबंध राखून काम करत असे.

१९४७ मध्ये स्वतंत्र मिळाल्यानंतर इंडियन पोलिटिकल इंटेलिजन्स (आय.पी.आय) ह्या संस्थेचे नामकरण वा रूपांतर इंटेलिजन्स ब्युरो मध्ये झाले तीच स्वतंत्र भारताची पहिली गुप्तहेर संघटना जी त्यावेळी देशांतर्गत तसेच आंतर राष्ट्रीय पातळीवर देखील गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करत असे.

परंतु १९४७,१९६५ चे पाकिस्तान विरूद्ध ,१९६२ चे चीन विरूद्ध युद्धात आणि नंतरच्या काळात , स्वतंत्र पणे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी  वेगळ्या गुप्तहेर संघटनेचे स्थापन करणे राज्यकर्त्यांना निकडीचे वाटू लागले व त्यातूनच १९६८ ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी इंटेलिजन्स ब्युरो मध्ये उपसंचालक पदी अधिकारी असलेल्या  श्री रामेश्वर काव ह्यांच्या नेतृत्वाखाली रॉ (संशोधन आणि विश्लेषण विभाग ) ची स्थापना केली की ज्या संघटनेचा मुख्य उद्दिष्टे हे भारतच्या हित संबंधाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रक्षण करणे ज्यात भारतविरोधी दहशत कारवाया , शत्रू राष्ट्राच्या हालचाली ,जगात घडणाऱ्या राजकीय , लष्करी  ,आर्थिक आणि वैज्ञानिक हालचाली यावर लक्ष ठेवून त्याचे भारतावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे हे आहे .

रॉ किंवा जगातील इतर देशांच्या गुप्तहेर संघटना च्या गुप्तहेरांची कार्यपद्धती ,माहिती गोळा करण्याची लकब , समाजातील वावर या बाबत सर्व सामन्याच्या मनात अनेक दंतकथा , समज–गैरसमज असतात आहेत , बहुतांशी बॉलिवूडच्या मारधाड छाप चित्रपटामुळे ते अमानवी ताकद असणारे सुपर हीरो असतात .

रॉ आणि भारतीय भारतीय गुप्तहेर संस्था आणि त्यांची कार्यपद्धती यावर अधिकारवाणीने भाष्य करणाऱ्या पुस्तकाचा मराठीत दुष्काळ आहे, त्यातल्या त्यात रॉ मध्ये काम केलेल्या एखाद्या भूतपूर्व अधिकाऱ्याने लिहिलेल्या पुस्तकांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकी आहे आणि ती देखील इंग्रजी मध्ये उपलब्ध आहेत.

त्याच दुर्मिळ पुस्तकापैकी बी रमण लिखित द काव बॉयज ऑफ आर अँड एडब्ल्यू (रॉ) डाऊन मेमरी लेन हा तसा उत्तम माहिती चा दस्त ऐवज आहे. 

श्री बी रमण हे १९६१ च्या भारतीय पोलिस सेवा तुकडीचे पोलिस अधिकारी त्यांनी नोव्हेबर-१९६२ ते जुलै १९६७ या काळात मध्यप्रदेशात पोलिस अधिकारी म्हणून काम केले त्यानंतर ते इंटेलिजन्स ब्युरो मधील आंतरराष्ट्रीय विषयावरील काम करणाऱ्या विभागात रूजू झालेत, १९६८ मध्ये रॉ ची स्थापना केल्या नंतर त्यांची रॉ मध्ये नेमणुक झाली ,१९८८–९४ पर्यंत ते रॉ च्या दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख होते ,३१ ऑगस्ट १९९४ रोजी अतिरिक्त सचिव म्हणून निवृत्त झाले.

श्री रमण ह्यांनी ह्या पुस्तकात सौ इंदिरा गांधी ते  श्री पी व्ही नरसिंह राव ह्यात सात पंतप्रधानाच्या कालखंडातील रॉ विषयक घडामोडी, वेगवेगळ्या पंतप्रधानाचे रॉ विषयक दृष्टीकोन, रॉच्या विविध मोहिमा याचा आढावा घेतला आहे . त्यात त्यांचा फ्रान्स मधील कालखंड ह्या कालखंडातील  त्यांची नेमणूक ही "दि  हिन्दू" वृतपत्राचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक होती विशेष म्हणजे वैचारिक दृष्ट्या डाव्या विचारसरणीच्या "दि  हिन्दू "  वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाने यासाठी भारत सरकारला ही नेमणूक करून सहकार्य केले होते.

पुस्तकात स्वतंत्र्य मिझो राष्ट्राची मागणी करणारे मिझो बंडखोर ते मिझोराम चे लोकशाही मार्गाने निवडून येणारे आणि मुख्यमंत्री पदी बसणारे श्री. लाल डेंग यांचा प्रवास ,बांगलादेश निर्मिती , सिक्कीम चा भारतातील समावेश ,१९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टार नंतर परत एकदा सुवर्ण मंदिर अतिरेक्यांच्या विळखातून सोडवण्यासाटी भारत सरकारकडून हाती घेण्यात आलेले ऑपरेशन ब्लॅक थंडर  (एप्रिल १९८६ आणि मे १९८८),मुळी खलिस्तान दहशतवादी चळवळीला सुरवातीच्या काळात पाश्चिमात्य राष्ट्राकडून सुरवातीच्या काळात काही आक्षेप नव्हता कारण त्यामध्ये कॅनडा सारख्या देशातील मताचे राजकारण होते होय त्या राष्ट्रांमध्ये शिखांची मोठ्या प्रमाणात असणारी लोकसंख्या त्यास कारणीभूत होती परंतु कनिष्क विमानाचे अपहरण करून त्यास घडवलेल्या घातपातामुळे कालांतराने पाश्चिमात्य राष्ट्राचा या दशतवादी चळवळी कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नुसता बदलला नव्हे तर सुरवातीला ह्या दशतवाद्यांना ह्या राष्ट्रातून मिळत असलेल्या आर्थिक साह्याचे  पुरावे देऊन देखील कारवाई करण्यास काचकुच करणाऱ्या देशांनी नंतर अशी अनेक संशयास्पद बँक खाती तत्काळ गोठवलीत ,१९९३ च्या मुंबई मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाची उकल या सारख्या बऱ्याच गोष्टी उलगडण्यात वा घडवून आणण्यात रॉ ची भूमिका फार महत्वाची  होती हे ह्या पुस्तकातून अधोरेखित होते . 

पुस्तकात नुसतेच रॉ चे गोडवे गाण्यात आले नसून बऱ्याच अंशी काही अपयश पण मांडण्यात आले आहे जसे की एकदा प्रधानमंत्री कार्यालयातच  (पी एम ओ) फ्रेंच गुप्तचर संस्थेने घुसखोरी केली होती . 

या पुस्तकातून काय हाती लागते तर आधुनिक भारतातील रॉ ह्या गुप्तहेर संस्थांची जडणघडण त्यास पोषक असणारे श्रीमती इंदिराजींचे कणखर नेतृत्व होय कारण लेखकांनी ७  भारतीय पंतप्रधानाची कारकीर्द अनुभवली त्यांच्या दृष्टीने इंदिराजी ,राजीवजी काही अंशी श्री .चंद्रशेखर आणि श्री पी व्ही नरसिंह राव वगळता इतर पंतप्रधानांची कारकीर्द रॉ साठी पोषक नव्हती वा श्री मोरारजी भाई देसाई आणि श्री व्ही पी सिंह यांचा रॉ कडे बघण्याचा दृष्टीकोन हा पूर्व ग्रह दूषित होता असेलही कारण दोन्ही सरकारे ही काँग्रेस द्वेषातून सत्तेवर आलेली होती त्यात श्री व्ही पी सिंह यांना रॉ  चा राजीव गांधीं भोवती संशयचे मोहोळ निर्माण करणाऱ्या बोफोर्सचं प्रकरणावर पडदा टाकण्यात रफादफा करण्यात रॉ भूमिका आहे असे या संशय पिशाच्च्याने पछाडलेले होते असो . 

ज्यांना रॉ बद्दल आणि त्यांच्या कारवाई बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी द काव बॉयज ऑफ आर अँड एडब्ल्यू (रॉ) डाऊन मेमरी लेन एक उत्तम आणि खात्रीशीर माहितीचा स्रोत ठरेल यात तिळमात्र शंका नाही . 

 द काव बॉयज ऑफ आर अँड ए डब्ल्यू (रॉ) डाऊन मेमरी लेन मध्ये माझ्या दृष्टीने एकच उणीव जाणवते ती म्हणजे रॉ सोडून इतर गुप्तहेर संस्थांना जाऊन सामील झालेल्या रॉ सदस्याच्या बाबत लेखकानी मौन बाळगले आहे कदाचित संस्थेवरील प्रेमापोटी वा व्यावसायिक बांधिलकी पोटी उल्लेख टाळला असेल.

#रॉ
#RAW
#researchandanalysiswing
#BRaman
#thekaoboys
#rnkao

© स्वप्निल पवार

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...