Saturday, August 1, 2020

बाँबस्फोटानंतर.... मालेगाव

मी ज्या शहरातून आलोय त्या शहराबद्दल पण पुस्तक आहे असे कळल्यानंतर क्षणाचा ही विलंब न लावता ऑनलाईन मागवून वाचून संपवलेले हे #निळूदामले लिखित #बाँबस्फोटानंतरमालेगाव

#मालेगाव जिल्हा #नाशिक

जिथला पाऊस देखील #झांजेश्र्वराचा अभिषेक आणि #ईदगाह मैदानावर ची नमाज ऐकल्याशिवाय पडत नाही असे हिंदू आणि मुस्लिम धर्मीय संस्कृती ची सरमिसळ आणि एकरूपता असणारे एक महाराष्ट्रातील शहर.

ज्याला महाराष्ट्रातील इतर शहरा प्रमाणे इतिहास आहे भूगोल आहे.

तसे बाहेरच्यांच्या  दृष्टीने नदीच्या (मोसम उर्फ मोक्ष दाहिणी ) प्रवाहामुळे अलीकडे आणि पलीकडे असे भौगोलिदृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या विभागले गेलेले शहर काही लोकांच्या दृष्टीने मालेगाव म्हणजे छोटा पाकिस्तान वर्तमानात कोरोना मुळे देशपातळीवर गाजणारे  शहर पण ही मालेगावची खरी ओळख नाही. 

माझ्या दृष्टीने मालेगाव म्हणजे

#महाराष्ट्राचेमँचेस्टर ,महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे #.स्व #भाऊसाहेब #हिरे यांच्या सारखे दिग्गज नेते देणारे मालेगाव निव्वळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्राचे नेतृत्व करायची धमक असणारे नेते ज्या मातीत तयार झाले ते मालेगाव

जसे मालेगावातील हिंदू नी राज्य पातळीवर नेतृत्व केले तसे मुस्लिम धर्मीय विचाराने कडवे समाजवादी ,मालेगाव महानगरपालिका झाल्यानंतर पहिले महापौर असणारे पैगंबर वासी निहाल अहमद यांनी देखील राज्याचे कामगार मंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले ह्याचं निहाल भाईनी बाबरी मशीद पतनानंतर त्या घटनेचा निषेध म्हणून मरेपर्यंत आपल्याला सफारी वर काळी पट्टी बांधली असे मालेगाव आणि मालेगावचे लोक.

तसे #बाँबस्फोटानंतरमालेगाव हे १४५ पानाचे पुस्तक सप्टेंबर २००६ मध्ये झालेल्या बॉमबस्फोटां मध्ये मृत पावलेल्या ३१ मृतापैकी २७ मृताच्या परिवाराच्या लेखकांनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांची स्थिती (२००८ पहिली आवृत्ती) बॉम्ब स्फोटाचे त्यांच्या जीवनावर झालेले परिणाम, सरकारची तुटपुंजी भरपाई ,त्यात मालेगाव मध्ये नसणाऱ्या मुलभूत आरोग्य सुविधा त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्या मुळे आपल्या आप्तेष्टांच्या प्राण गेले ही नातेवाईकांची खंत तसेच बॉम्ब स्फोटाचे आरोपी म्हणून पकडले गेलेले नी माफिचे साक्षीदार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मुलाखती , मालेगावातील मानससोपचार तज्ञ यांची मते, हिंदू व्यापाऱ्यांच्या दृष्टीने मालेगाव नी तेथील बाजारपेठ हे सर्व व्यापकपणे नी त्यांच्या शब्दात लिहण्यात आले आहे.

ज्या प्रमाणे लेखक अधोरेखित करतात त्याप्रमाणे बढा वह पेट का घटा वह सेठ का ही मानसिकता सोडून मालेगांवात देखील पौर्वात्य देशाप्रमाने इस्लाम चा नव्याने अभ्यास होणे जरुरी आहे तरच मालेगाव हे रुढी परंपराच्या जंजाळातून बाहेर पडेल आणि २१ व्या शतकाशी एकरूप होऊ शकेल

हे पुस्तक कोणी वाचावे

१.ज्याला मालेगाव समजून घ्यायचे आहे त्या सर्वांनी
२. मालेगाव विषयी न समजून घेता मत व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाने
३. सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाने

#निळूदामले

#बढावहपेटकाघटावहसेठका

© स्वप्नील पवार

1 comment:

  1. I am from Malegaon my birth education sarv kahi malegaon and I love my city

    ReplyDelete

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...