Tuesday, September 17, 2024

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस



एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस

उद्योग धंदा (कारखाना व आस्थापना ) हे विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून व्यवस्थापनाने ठरवलेल्या इप्सित ध्येयाकडे (Goal ) यशस्वी पणे वाटचाल करतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी ऑपरेशन्स ,फायनान्स ,सप्लाय चेन मॅनजमेन्ट ,ह्यूमन रिसोर्स व ऍडमिनिस्ट्रेशन आणि इतर सर्व विभाग हातात घालून झटत असतात .

आजच्या मनुष्य बळ विकास विभागाचा (एच आर )पर्सोनेल ते पीपल मॅनजमेन्ट ह्या प्रवासात बरेच उपविभाग वा COE (सेंटर ऑफ एक्ससेलन्स) निर्माण झालेत अथवा निर्माण करण्यात आले , त्यातील एनगेजमेंट बाबत असणाऱ्या अतिउत्साहामुळे व फेसबुक ,इंस्टाग्राम सारख्या समाज माध्यमातून वर प्रसारित (व्हायरल) होणाऱ्या रील्स मधून ही एचआर ची प्रतिमा ही कमी अधिक बिनकामाचे ,रांगोळ्या काढणारे आणि टाइम पास करणारे अशीच झाली आहे .

आणि त्यात भर जागतिकीकरणा नंतर कामगार संघटना ,कामगार मालक संबंध,कामगार अधिकारी हे थोडं डाउन मार्केटच झालेत आणि अडगळीला गेलेत गेला बाजार त्याचा परिणाम म्हणून कधीकाळी इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि आजचे एम्प्लॉयी रिलेशन्स हे म्हणजेच एचआर असायचे ते आज एक COE (सेंटर ऑफ एक्ससेलन्स) पैकी एक उपविभाग बनून रिवॉर्ड रेकग्निशन (R&R), कंपेनसेशन बेनेफिट (C&B) ,एम्प्लॉयी एनगेजेमेंट (EE), ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट (OD) या मोठ्या मोठ्या नावात कुठेतरी जागा टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसते आहे आणि कदाचित त्याच्याच परिणाम म्हणून एचआर मध्ये करियर करु पाहणारी पिढी आयआर किंवा इआर मध्ये जाण्यास उत्सुक नसते आणि त्याचीच परिणिती म्हणून चांगले आयआर मॅनेजर मिळत नाहीत म्हणून जुनी पिढी हळहळ व्यक्त करताना ही दिसते.

आणि कदाचित त्याच्या परिणाम म्हणूनच बऱ्याच वेळा कारखान्यातील वा आज नव्याने येऊ घातलेल्या प्लॅटफॉर्म वर्कर्स (गिग वर्कर्स) यांच्यातील औद्योगिक संबंध हे हिंसक वळण घेताना पण दिसतात ( विस्ट्रोन कारखाना कर्नाटक, प्लॅटफॉर्म वर्कर्स ने देशाच्या विविध भागात वेळोवेळी केलेले काम बंद आंदोलन आणि त्या अनुषंगाने डेक्कन हेरॉल्ड ह्या दैनिकात प्रकाशित झालेल्या आकडेवारी नुसार २०१८ ते २१ या काळात संप, टाळेबंदी या मुळे खाजगी क्षेत्राने १७.०३ लक्ष मनुष्य दिवस (Mandays) गमावलेले आहेत ).

त्यामुळे बदलत्या काळात देखील आयआर इआर चे महत्त्व अधोरेखित होताना दिसते आहे ह्याच आय आर इआर च्या क्षेत्रात श्री जेकब वर्गीस यांनी विविध कारखान्यात आणि भारताच्या विविध राज्यात ३ दशकांहून अधिक काम केले आहे.सध्या ते पुणे येथे बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये १२ वर्षापासून व्हाइस प्रेसिडेंट एच आर/आयआर  या पदावर कार्यरत आहेत. याच सर्व अनुभवांच्या पोतडीतून त्यांनी १९ कथा एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस या पुस्तकाच्या रूपाने मांडल्या आहेत.

त्या कथा म्हणजे नुसते स्ट्राईक, लॉक आऊट पुरत्या मर्यादित नसून एका एचआर/आय आर मॅनेजरला कारखान्यात काम करत असताना येणारे नाजूक, कठीण प्रसंग कसे हाताळावे याचा त्यांनी  घालून दिलेला वस्तूपाठ आहे . त्यात अगदी कारखान्यांतील सुरक्षेपासून ते व्यक्तिगत अहंकार याने कारखान्याच्या उत्पादन क्षमते आणि इंडस्ट्रीयल रिलेशन वर काय परिणाम होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

या सर्व बाबीं मुळे हे पुस्तक इंडस्ट्रीयल /एम्प्लॉइ रिलेशनस् या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी वा भविष्यात येऊ इच्छिणाऱ्या साठी पाठ्य पुस्तकां एवढाच किंबहुना त्या हून अधिक तोलामोलाचा आणि महत्त्व पूर्ण असा न चुकवता येणार संदर्भ आहे यात काही शंका नाही.

#bookrecommendations 

#bookstagram

 

No comments:

Post a Comment

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस उद्योग धंदा (कारखाना व आस्थापना ) हे विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्न...