तसे जगाच्या पटलावर विविध अतिरेकी संघटना कडून विविध राजकीय नेत्याच्या हत्या झाल्या आहेत त्यात प्रामुख्याने आयरिश आर्मी कडून भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन , पंजाबी दहशतवाद्यांकडून इंदिरा जी नी सरतेशेवटी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम कडून राजीव जी ह्या तिन्ही दुर्दैवी हत्या कांडा विषयी बरेच पुस्तके आहेत त्याच पुस्तकातील मी वाचलेले
नीना गोपाल लिखित
राजीव गांधी हत्या–कारण–राजकारण गांधी हत्या ह्या विषयाची दुसरे पुस्तक तसे श्री डी आर कार्तिकेयन व श्री राधा विनोद राजू लिखित हे सत्यमेव जयते शोध राजीव - हत्येचा हे पहिले पुस्तक दोन्ही पुस्तकांचे वैशिष्ट म्हणजे पाहिले पुस्तक.दोन्ही पुस्तके हे पुस्तकाच्या लेखक आणि लेखिकेमुळे वेगळी ठरतात डी आर कार्तिकेयन हे राजीव गांधी हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि नीना गोपाल ह्या श्री पेरंबदुर येथील बॉम्ब स्फोटात श्री राजीव जी च्या सोबत शेवटच्या क्षणा पर्यंत असणाऱ्या पत्रकार.
तसे राजीव जी हे भारतीय राजकारणाला पडलेले एक लोभसवाणे स्वप्न मूळचे वैमानिक असणारे आणि कधीही राजकारणात येण्यास उत्सुक नसणारे नेतृत्व पण संजय गांधीचे अकाली अपघाती निधन आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार च्या नंतर उमटलेल्या प्रतिक्रियेतून १९८४ श्रीमती इंदिरा गांधी यांची वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी केलेल्या दुर्दैवी हत्या यामुळे सोनिया गांधी यांचा विरोध असतानाही पक्षातील कार्यकर्त्याचा आग्रह म्हणून राजकारणा त आलेले आणि ४०० हून अधिक खासदार निवडून येऊन पंतप्रधान झालेले राजीव जी .
तसे राजीव जी भारताला लाभलेले पाहिले टेक्नॉ सव्ही पंतप्रधान आजच्या लॉक डाऊन काळात जे काही टेलिफोन, इंटरनेट या सारख्या सुविधांचा आपण उपभोग घेतोय त्याची पायाभरणी ही राजीव जी यांच्या काळातील
मुळात राजीवजी हे माझ्या आकलन प्रमाणे काही मुरब्बी नी धूर्त राजकारणी नव्हते ते एक साधे सरळ आणि प्रगतिशील विचार करणारे व्यक्ती महत्व होते .
ज्या प्रमाणे राजीवजी हे प्रगतिशील विचारांचे नेतृत्व होते त्याच प्रमाणे ते त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत काही निर्णयामुळे वादग्रस्त ठरले होते त्यात शाहबानो पोटगी प्रकरण, बोफोर्स घोटाळा आणि श्रीलंकेतील तामिळी वाघांच्या विरूद्ध सिंहली सत्तेच्या मदती साठी शांती सेना पाठवण्याचा निर्णय.
नीना गोपाल लिखित खालील पुस्तकात ८ प्रकरणे आहेत हे पुस्तक पूर्वार्धात हत्येचा कट,हत्या आणि त्याची पार्श्वभूमी, एल टी टी ई नेता प्रभाकरन आणि त्यांचे संबंध भारत सरकारने सुरवातीला श्रीलंकेतील तामिळी ना भारतीय भूमी वर दिलेला सर्व प्रकारचा आश्रय आणि अचानक पण १९८७ मध्ये शांती सेना पाठवायचा निर्णय, श्रीलंकेतील लष्करी संचालना दरम्यान एका नौसेना सैनिकाने बंदुकीच्या दस्त्याने केलेला हल्ला , श्रीलंका म्हणजे भारताचे व्हिएतनाम
आणि पूर्वार्धात श्रीलंकन सरकारने प्रभाकरनच्या अंत करू एल टी टी ई चा केलेला बीमोड,त्या साठी अवलंबवलेल्या चाली मार्ग नी आजची जाफना मधील स्थिती ह्या वर भाष्य केलेले आहे.
माझ्या दृष्टीने हे पुस्तक राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ ते २०१५ नी आज पर्यंत घडलेल्या घडामोडीचा इतिहास आहे .
कोणी वाचावे
१. राज्य शास्त्राचे विदयार्थी हे आंतरराष्ट्रीय संबंध यासाठी वाचू शकतात
२.राजीव गांधी यांच्याबद्दल हत्या कांडाबद्दल माहिती घेण्याची इच्छा असणाऱ्यासाठी
३. एल टी टी ई , प्रभाकरन त्यांचे भारतीय भूमी वरील सहानुभूती दार

समर्पक शब्दात अचूक माहिती.. 👌👌
ReplyDeleteNicely prescribed👌👌
ReplyDeleteNicely prescribed����
ReplyDelete