Saturday, August 1, 2020

युद्ध जीवांचे जैविक आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास

लॉक डाऊन कालखंडात वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचताना गिरीश कुबेर लिखित



युद्ध जीवांचे जैविक आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले मुळात डिसेंबर–२०१९ पासून संपूर्ण जगाला कोविड–१९ उर्फ कोरोना विषाणूच्या साथीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे .

जगात ह्या कोविड–१९ साथीने भारत नव्हे तर जगातील सर्व शक्तिमान महासत्ता असलेला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सुद्धा सुटला नाही परंतु या विषाणूजन्य साथीचे उगम असलेला चीन मधील वुहान प्रांत सोडला तर चीन मध्ये साथीचा प्रभाव वरकरणी नगण्य दिसतो कदाचित चीनच्या पोलादी पडद्या आड सर्व काही झाकले गेले असेल किंवा आजुन ती वेळ आली नसेल किंवा कदाचित येणार नाही पण जुन्या लोकांची म्हण आहे कोंबड कितीही झाकलं तरी तांबड फुटायच थांबल नाही असो.

तसे गिरीश कुबेर लिखित ह्या पुस्तकाच्या विषय हा जैविक आणि रासायनिक अस्त्र अश्या मिश्र स्वरूपाचा आहे आणि त्यांना बेन अलीबेक लिखित बायोहजार्ड ह्या पुस्तकातून सदर विषयावर लिहण्याची कल्पना सुचली .

मुळात सर्व सामान्य मानवाच्या दृष्टीने विषाणू ची किंवा जिवाणूंची साथ ही नैसर्गिक रित्या आलेले संकट असते अथवा देवाचा वा निसर्गाचा कोप असतो पण हे पुस्तक वाचल्यावर असे जाणवते की हे तर मानव निर्मित आणि मानवाने मानवाच्या अंतासाठी नी सर्वनाश होण्यासाठी निर्मिलेली मानवनिर्मित अस्त्र आहेत ज्यात मानवाच्या आपल्याच सहचरावर अधिराज्य करायच्या असुरी आकांक्षा असतात नी आहेत.

औषध निर्मिती हे तसे मानवाच्या कल्याणासाठी आणि त्याचे आयुष्य निरोगी राहण्यासाठी खटाटोप करणारे कल्याणकारी क्षेत्र पण त्याच औषध निर्माण करणाऱ्या फार्मा कंपन्या ह्या त्यांचे आर्थिक स्वास्थ राखण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ,साधारण २००९–१० मध्ये आलेली स्वाइन फ्ल्यू ची साथ ही साथ एका आर्थिक दृष्ट्या गर्तेत गेलेले औषध निर्माण कंपनी ला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी एक सुवर्ण संधी ठरली सर्व भारतीयांनी ह्या साथी पासून वाचण्यासाठी चण्या फुटाण्या सारखे ट्यमी फ्ल्यू हे खाल्ले ह्यातूून उत्कर्ष झाला तो जीलेेद आणि रोशे हया विदेेेशी कंपन्या चा त्यांचे शेयर मार्केट मध्ये शेयर एका उंचीला गेले आणि अमेरिकन सत्ताधीशांनी नी ह्या कंपन्यांनी बक्कळ नफा कमावला हीच नव्हे तर अशी बरीच उदाहरणे आहेत त्यात संडोझ सारख्या कंपनीने गुप्त मोहिमेसाठी फ्रान्स मध्ये एल एस डी पुरवून गाव भ्रमिष्ट केलेत.

हीच नव्हे तर युद्धात एका देशाने दुसऱ्या देशाला संपवण्यासाठी सिरीन गॅस मसटर्ड गॅस यासारखी संहारक अर्स्त्र नुसती निर्माण केली नाहीत तर ती वापरली आणि पिढ्यान् पिढ्या न दुरूस्त न होऊ शकणाऱ्या कायम स्वरुपीची दुखणी दिलीत .

या सर्व उद्योगात नुसते सांसारिक नव्हे तर सो कॉल्ड सन्याशी देखील मागे नव्हते ओशो उर्फ आचार्य रजनीश यांच्या अनुयानी तर अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात साल्मोनेला या जीवाणूंचा वापर करून जनतेच्या पोटाची भांडे विसळवित अशी उदरे साफ केलीत.

ह्या आणि यांच्या सारख्या महत्व पूर्ण माहिती चा भांडार म्हणजे युद्ध जीवांचे जैविक आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास

जाता जाता आज रोजी तरी सर्व महाराष्ट्र आणि भारत आणि तमाम मानव जात ह्या कोरोणा विषाणूच्या साथी मुळे लॉक डाऊन झालेली आहे सर्व सत्ता ह्या युद्ध पातळी वर आपली आर्थिक, बौद्धिक ताकद लावून ह्या संकटातून वर येण्याचा मार्ग नी रामबाण उपाय शोधत आहे

पण ह्या सर्वात पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत म्हटल्या प्रमाणे तुम्ही आम्ही हे गिन्नी पिगज आहोत का हो

पुस्तक कोणी वाचावं

१. जैविक आणि रसायनिक शस्त्रांची माहिती ज्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्यांनी

२. सर्व साथी ह्या नैसर्गिक असतात असा समज असणाऱ्या सर्वांनी

#गिरीशकुबेर
#युद्धजीवांचेजैविकआणिरासायनिकयुद्धाचासंसर्गजन्यइतिहास
#जैविकयुद्ध
#कोवीड19
#कोरोना

No comments:

Post a Comment

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस

एम्प्लॉयी रेलेशन्स डेमिस्टीफाइड रिअल लाइफ एक्सपेरियन्सस - जेकब वर्गीस उद्योग धंदा (कारखाना व आस्थापना ) हे विविध विभागांच्या एकत्रित प्रयत्न...